Take a fresh look at your lifestyle.

GK Question in Marathi : जगात सर्वात जास्त प्रमाण असणारा रक्तगट कोणता ?

0

शेतीशिवार टीम, 13 मार्च 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : गाय तर चारा हिरवा खाते मंग ती पांढरं दूध कसं काय देते ?
उत्तर : दुधाला पांढरेपणा कॅरोटीन नामक प्रोटीन घटकामुळे मिळतं. हे प्रोटीन कॅल्शियमसोबत दुधाला पांढरं करतं. दुधात आढळणारं फॅट हे पांढर्‍या रंगाचं असतं. याच कारणामुळे दुधात जितक्या प्रमाणात फॅट आणि चिकनाई असते तेवढंच ते दूध शुभ्र पांढरं असतं. जेव्हा कमी क्रीम आढळणार्‍या दुधाचा रंग ऑफ व्हाईट असा असतो. फॅट अधिकतेमुळे म्हशीचे दूध गायीच्या दुधाच्या तुलनेत अधिक पांढरं असतं.

प्रश्न : दुधाचे उत्पादन वाढावं म्हणून महाराष्ट्र शासनाने 1971 मध्ये कोणती योजना राबवली ? .
उत्तर : धवलक्रांती

प्रश्न : मानवी छाती मध्ये एकुण किती हाडे असतात
उत्तर : 34

प्रश्न : मानवाच्या पाठीमध्ये एकुण किती मणके असतात ? .
उत्तर : 33

प्रश्न : पोलिओ लसीचा शोध कोणी लावला ?
उत्तर : जोनास साल्क
एक निष्क्रिय पोलिओ लस (IPV) डॉ. जोनास साल्क यांनी विकसित केली होती आणि ती पहिल्यांदा 1955 मध्ये वापरली गेली होती.
डॉ. अल्बर्ट सबिन यांनी विकसित केलेली थेट (अटेन्युएड) ओरल पोलिओ लस (OPV) आहे आणि ती 1961 मध्ये पहिल्यांदा वापरली गेली.

प्रश्न : मानवी चेहऱ्यातील हाडांची संख्या किती असते ?
उत्तर : 14

प्रश्न : मानवी शरीरातील नायट्रोजनचे प्रमाण किती असतं ?
उत्तर : 02.040 किलो

प्रश्न : धातूच्या कोणत्या गुणधर्मामुळे पत्रे तयार करता येतात ?
उत्तर : वर्धनियता

प्रश्न : कोणत्या मातीमध्ये जिप्समचा वापर केला जातो?
उत्तर : अल्काईन

प्रश्न : कोणत्या मिश्रणातील घटक संप्लवनाने वेगळे करता येऊ शकतात ?
उत्तर : नवसागर + मिठ

प्रश्न : सर्वात जास्त मूलद्रव्ये असलेले आवर्तन कोणते ?
उत्तर : सहावे

प्रश्न : शरीरातील सर्वांत मोठी नलिका विरहीत ग्रंथी कोणती?
उत्तर : प्लिहा

प्रश्न : जगात सर्वात जास्त प्रमाण असणारा रक्तगट कोणता ?
उत्तर : O ( 46% )
भारतात B+ गटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात 38.13% लोकांचा रक्तगट B+ आहे. 27.85% लोकांचा रक्तगट O+ आणि 20.8% लोकांचा रक्तगट A+ आहे. 8.93% लोकांचा रक्तगट AB+ आहे.

ऑस्ट्रेलियातील 40% लोक O+ रक्तगटाचे आहेत. A+, B+, AB+ 31 टक्के, आठ टक्के आणि दोन टक्के रक्तगटाचे आहेत. यूएस मध्ये, O आणि A रक्तगटांचे प्रमाण 44 टक्के आणि 42 टक्के आहे, तर B आणि AB रक्तगटांचे प्रमाण 10 आणि 40 टक्के आहे. सौदी अरेबियामध्ये 0+ गटातील 48 टक्के, A+ गटातील 24 टक्के, B+ गटातील 17 टक्के आणि AB+ गटातील 4 टक्के लोक आहेत.

प्रश्न : मानवी लहान आतड्याची लांबी सर्वसाधारणपणे किती असते ?
उत्तर : 6 ते 7 मीटर
प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे तपकिरी-जांभळ्या रंगाचे असतं, हे सुमारे 35 मिलिमीटर (1.5 इंच) व्यासाचे आणि सरासरी लांबी 6 ते 7 मीटर (20-23 फूट) असते.

प्रश्न : सुर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येऊन पोहचण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर : 8.3 मिनीटे
सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर 14,96,00,000 किलोमीटर किंवा 9,29,60,000 मैल आहे. आणि सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 8.3 मिनिटे लागतात. ही प्रकाश ऊर्जा प्रकाशसंश्लेषण नावाची महत्त्वपूर्ण जैवरासायनिक प्रतिक्रिया घडवून आणते, जी पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे.

प्रश्न : कोणत्या शास्त्रात मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास केला जातो ?
उत्तर : न्युरॉलॉजी

प्रश्न : मेंदूच्या कोणत्या भागात रक्ताभिसरन व श्वसन नियंत्रणाचे केंद्र असते ?
उत्तर : लंबमज्जा

प्रश्न : डोळ्यांतील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो?
उत्तर : काच बिंदू

प्रश्न : मानवी शरीरातील सर्वात मोठं आणि छोटं हाड कोणतं ?
उत्तर : मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड हे फेमर आहे. ते आपल्या मांडीत असतं. त्याची सरासरी लांबी 50.50 सेमी आहे. आणि ते शरीराच्या एकूण लांबीच्या 26% आहे.
शरीरातील सर्वात लहान हाड आपल्या कानात असते ज्याला स्टेपीज असं म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.