आपलं शेतातलं उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला बगल देत फळलागवड, पालेभाज्यांकडे वळले आहे. ज्यामध्ये त्यांना चांगला नफा मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, ड्रॅगन फ्रुटची लागवड भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे.
सामान्यतः हे फळ थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु आता भारतातही त्याची मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जात आहे. यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 4 लाखांचे अनुदानही देण्यात येत आहे.
चांगल्या प्रतीच्या लाल ड्रॅगन फ्रूटची किंमत 200 ते 250 रुपये किलोपर्यंत आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. यातून बंपर मिळू शकतात. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणीही हे फळ चांगले वाढते. ड्रॅगन फ्रूटचा वापर जॅम, आईस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये केला जातो. तसेच, फेस पॅकमध्येही केला जात आहे, त्यामुळे त्याची प्रचंड मागणी वाढत आहे.
पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व प्रादुभाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची किडींचा मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे.
या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेवून सन 2021-22 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमीनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. 73 मी. 3मी. 72.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रिटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर कॉक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी.
सदर सिमेंट काँक्रिट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार वाजूला चार रोपे लावावित, ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण याबाबींकरिता अनुदान देय आहे. याकरिता चार लाख प्रति हेक्टर प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40% प्रमाणे रक्कम रू. 1.60 लाख प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे.
तीसऱ्या दुसऱ्या वर्षी 75% व 90% झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगनफूट लागवडीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परंतु हा अर्ज कसा कराल ? कागदपत्रे काय लागतील ? याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा