विकास ही एक चालू प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आमदार अशोक पवार यांनी कधीच खंड पडू दिला नाही. 2009 ला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी विकास कामाचं व्रतच हाती घेतलय.. 

2009 ते 2014 या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये 25 वर्षांत होणार नाही एवढा मोठा विकास त्यांनी पाचच वर्षांत शिरूर – हवेलीत करुन दाखविला. विकास कामांच्या जोरावर कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

पण 2014 ला देशात सत्तांतराचे वारे वाहू लागले आणि त्याचा फटका आमदार अशोक पवार यांच्याबरोबर मतदार संघालाही बसला. 2014 ते 2019 पर्यंत विकास कामांना अक्षरशः खीळ बसली. विकास कामामध्ये मोठा खंड पडला.

2014 ते 2019 पर्यंत विकास कामामध्ये मतदार संघाची पिछेहाट झाली. हे जनतेच्या लक्षात आल्यानंतर 2019 ला प्रंचड मोठ्या मताधिक्यानं अशोक पवार यांना पुन्हा निवडून दिलं. मतदार संघाच्या विकासाला गती मिळाली. आमदार अशोक पवार यांनी विकास कामांची अक्षरशः खैरातच केली.

आजचं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. अशोक पवार त्यांच्या प्रयत्नातून भांबर्डे ते रांजणगाव गणपती रस्त्यासाठी 3 कोटी 92 लाखांचा निधी तर विठ्ठलवाडी (भोसेवस्ती) ते टाकळी भीमा रस्त्यासाठी 4 कोटींचा निधी निधी मंजूर झाला आहे. सदर कामही लवकरच सुरू करण्यात येणार असून या रस्त्यामुळे लाखो नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध, शिस्तबद्ध, नियोजनबद्ध, चंचल, सावध, अभ्यासू, विकासाची एक वेगळी दूरदृष्टी असल्यामुळे मतदार संघामध्ये येत्या काळात विकासाचा हिमालय पाहायाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की !

लेख – भरत चोरमले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *