अनेक वर्षापासून रखडलेल्या नारायणगव्हाण येथील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ग्रामस्थांकडून तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय शरद पवळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या चौपदरीकरणासाठी उपविभागीय अभियंता यांनी भूमी अभिलेख कार्यालयास पत्र पाठवून संयुक्त ही संदर्भात विचारणा केली आहे.
नगर पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर नारायण गव्हाण येथील 945 मीटरचे काम तसेच राहिले होते. अरुंद रस्ता तसेच वळणामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले होते. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याचे मागणी येत होती.
सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे तसेच ग्रामस्थांच्या लढ्यानंतर 945 पैकी 815 मीटरचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांनी सांगितले. नगर पुणे महामार्गावरील खड्डे व दिशादर्शक फलक आदींसाठी नारायण गव्हाण ग्रामस्थांनी तसेच शरद पवळे यांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहार केला. तसेच वेळोवेळी उपोषण टोल बंद आंदोलन अशाप्रकारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लढा उभारला.
नगर पुणे महामार्ग अपघात मुक्त होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी बांधकाम विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे सामाजिक कार्यकर्ते माननीय शरद पवळे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.