Take a fresh look at your lifestyle.

50,000 रु. अनुदानाची दुसरी यादी ‘या’ दिवशी होणार जाहीर ! पण ‘हे’ शेतकरी अनुदानास मुकणार, पहा डिटेल्स

0

कोरोना आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजाला धीर देण्यासाठी कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या अंतर्गत नियिमीत कर्जदारांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची तब्बल 2 वर्षांनंतर अंमलबजावणी झाली असून गुरुवारी अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

त्यानुसार राज्यातील 14 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झोडपलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली होती.

कर्जमाफी झाल्यानंतर ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांच्यावर अन्याय होवू नये यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

मात्र कोरोना आणि त्यानंतर सरकार कोसळल्याने प्रोत्साहनपर अनुदान लटकले होते . मात्र आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.

या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून अजून 2 याद्या जाहीर होणार आहे. यामधील दुसरी यादी 18 किंवा 19 तारखेला प्रसिद्ध होणार आहे.

या प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीमधील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखात्याचे व बचत खात्याचे पासबुक घेऊन संबंधित बँक शाखा किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतर 24 तासांच्या आत खात्यावर जमा होत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांची नावे आधार क्रमांकाची पूर्तता झाल्यानंतर, तसेच ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे, अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे आचारसंहिता संपल्यानंतर सदर यादीमध्ये समाविष्ट केली जातील.

खालील निकषांनुसार लाभ अनुज्ञेय नसलेल्या व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट असल्याचे आढळून आल्यास त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ न घेण्याचे आवाहन केलं आहे.

1. कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.

2. महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य , आजी / माजी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य.

3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी

4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी

5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे निवृत्तीवेतन रुपये 25,000/- पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून)

7. कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष , उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

कर्जमाफी यादी महाराष्ट्र 2022 PDF Download

नगर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

संभाजीनगर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

बीड जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.