BREAKING : शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, …अखेर 2000 रु. हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, पहा तुम्हाला मिळाले का ?
सणासुदीच्या काळात देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. देशातील कोट्यवधी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 2000 रुपयांचा हप्ता मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधीचा (PM-Kisan Samman Nidhi) 12वा हप्ता जारी केला आहे. या हप्त्याअंतर्गत पीएम मोदींनी रिमोटचे बटण दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत.
देशातील करोडो शेतकऱ्यांना दिवाळी भेट मिळाली असून प्रत्येकाच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुसा, दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी केला आहे.
13000 शेतकऱ्यांना केलं संबोधित :-
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13000 शेतकऱ्यांना संबोधित केलं आहे. विधेयक परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आज PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. या योजनेद्वारे सरकारने आतापर्यंत 25 लाख कोटी रुपये थेट लाभ ट्रान्सफर केला आहे.
रिमोटचं बटन दाबून पैसे केले ट्रान्सफर :-
रिमोट दाबताच शेतकर्यांच्या खात्यात ऑनलाइन रक्कम जमा झाली. मात्र, यावेळी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. उत्तर प्रदेशमधून 21 लाख लाभार्थी शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात बारावा हप्ता जमा झालेला नाही.
PM Kisan Yojana : बेनेफिशियरी लिस्टमध्ये चेक करा आपलं नाव
pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
Farmers Corner वर ‘Beneficiary Status‘ या ऑप्शनवर क्लिक करा.
आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडा.
डिटेल्स भरल्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.