7th Pay commission : DA 38% ने वाढल्यामुळे Level -3 च्या पगारात किती झाली वाढ ? पहा Pay Matrix मध्ये काय झाला चेंज
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने एकूण पगारातही (Total Gross Salary) बदल झाला आहे. 7 व्या वेतन आयोगातील प्रत्येक विभागानुसार, पे मॅट्रिक्स (Pay Matrix) तयार करण्यात आला आहे. वेतन मॅट्रिक्समध्ये विविध वेतनश्रेणी स्तर (Pay-scale level)आहेत. त्या सर्वांचा पगार वेगवेगळा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला, त्यानंतर त्यांच्या वेतन रचनेत बदल करण्यात आला.
नवीन वेतनश्रेणी मध्ये एकूण पगार सुमारे 14% वाढला. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने त्यात DA जोडण्यासही सुरुवात केली, त्यामुळे पगारात आणखी तफावत आली. त्याच्या वेतनाच्या मॅट्रिक्सनुसार, कोणताही कर्मचारी त्याच्या पगाराचे कॅल्क्युलेशन करू शकतो.
6 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 7 व्या वेतन आयोगाचा झाला मोठा फायदा
सहाव्या वेतनश्रेणीतील एंट्री लेव्हलवरील मूळ वेतन (Basic Salary) 7000 रुपये (पे बँड 5200 + ग्रेड पे 1800) होते. तर DA 125% मिळत होता, याचा अर्थ बेसिक पेक्षा अधिक DA अधिक मिळत होता. उर्वरित भत्ते आणि कपातीसह कर्मचार्यांना महिन्याला 14,757 रुपये मिळत होते. परंतु, 7 वा वेतन अयोग लागू झाल्यानंतर मासिक सकल वेतनात मोठी वाढ झाली आहे. DA पुन्हा शून्य करण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे, जो जुलै 2022 पासून लागू झाला आहे.
वेतन आयोग बदलल्याने पगारात किती बदल झाला ?
6 वा वेतन आयोग – 7 वा वेतन आयोग
7000 – 18000
13500 – 35400
21000 – 56100
46100 – 118500
80000 – 225000
90000 – 250000
फिटमेंट फॅक्टरशी जोडला पे -मॅट्रिक्स
पे -मॅट्रिक्स (Pay Matrix) च्या आधारावर पगार ठरला जातो. नव्या वेतनश्रेणीमध्ये, पे मॅट्रिक्स फिटमेंट फॅक्टरशीशी (fitment factor) जोडलेला होता. प्रारंभिक स्तरावरील कर्मचाऱ्याला फिटमेंट फॅक्टरच्या आधारे 2.57 पट पगार मिळतो. म्हणजे पे – मॅट्रिक्समध्ये लेव्हल 1 वर बेसिक 18 हजार रुपये दरमहा आहे. तर, स्तर 18 वर, ते दरमहा 2.5 लाख रुपये आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली आहे.
लेव्हल -3 मध्ये किती मिळतेय वेतनमान (Pay-scale)
प्रथम हे समजून घ्या की पे मॅट्रिक्स म्हणजे काय, आणि त्याचा कर्मचाऱ्यांच्या पगारावर कसा परिणाम होतो, आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे फायदा मिळतो ? 7 व्या वेतन अंतर्गत पे मॅट्रिक्स स्तर 3 च्या मूळ पगारावर पे – ग्रेड निश्चित केला जातो. सध्या, लेव्हल-3 मधील मूळ वेतन स्ट्रक्चर (Basic Pay) 21,700 रुपये आहे, तर जास्तीत जास्त 40 वाढीसह कमाल 69,100 रुपये आहे.
याप्रमाणे समजून घ्या लेव्हल-3 चे सॅलरी स्ट्रक्चर
उदाहरणाने समजून घेऊ. जर कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही विभागात पे मॅट्रिक्स लेव्हल – 3 अंतर्गत येत असेल तर त्याचेमूळ मूळ वेतन 21,700 रुपये आहे, तर त्या कर्मचाऱ्याचा एकूण पगार किती असेल ते जाणून घेऊया ?
लेव्हल आणि ग्रेड-पे : लेव्हल -3 (ग्रेड-पे-2000)
स्थळ : दिल्ली
मूळ वेतन : 21,700 रुपये
महागाई भत्ता (DA) : रु.8246 (मूलभूत वेतनाच्या 38%)
घर भाडे भत्ता (HRA) : रु 5,859 (27% / X शहर)
प्रवास भत्ता (TA) : रु. 4,716 (TA of Level-3 for A1 Class Cities)
एकूण पगार : (Gross Salary) : रु. 40,521