नवा कामगार कायदा (New Wage Code) लवकरच लागू होणार आहेत. पण, गेल्या 2 वर्षांपासून त्यांची चर्चा जोरात चालू आहे. देशात एकूण चार लेबर कोड लागू करण्यात येणार आहेत. बऱ्याच राज्यांनी ड्राफ्ट रूल्सवर संमती दिली आहे. नवीन कामगार कायदे लवकरच लागू होतील, अशी आशा कामगार ‘मंत्री भूपेंद्र यादव’ यांनी व्यक्त केली आहे.
कामगार मंत्रालयानेही तयारी पूर्ण केली आहे. न्यू वेज कोड लागू झाल्यावर पगारदार कामगारांना सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यांच्याकडे प्रोव्हिडेंट फंड निधीमध्ये अधिक निधी जमा होईल. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, मंथली इन हॅन्ड सॅलरी काही प्रमाणात कपात झाली असली तरी रिटायरमेंट फंड EPF च्या माध्यमातून अधिक निधी जमा होईल. फक्त तुमचे EPF खातेच तुम्हाला करोडपती बनवू शकते.
New Wage Code calculation :-
New Wage Code लागू करताना, असे गृहीत धरू की एम्प्लॉयचे बेसिक सॅलरी दरमहा 25 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत, रिटायरमेंट त्याच्याकडे एकूण EPF ची रक्कम 1,18,58,402 रुपये असेल. या गणनेत 5 % वार्षिक वाढही ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे EPF निधी आणखी वाढेल.
सध्याच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास, एखाद्या एम्पलॉयची सॅलरी मंथली सॅलरी 50,000 रुपये आहे आणि बेसिक सॅलरी 15,000 रुपये आहे, तर रिटायरमेंट च्या वेळी PFची रक्कम 64,62,867 रुपये होईल.
किती आहे कॉस्ट टू कम्पनी ?
CTC म्हणजे कंपनीने तिच्या एम्पलॉयवर केलेला खर्च. हे ॲम्पलॉयचे संपूर्ण सॅलरी पॅकेज आहे. CTC मध्ये मासिक बेसिक सॅलरी, भत्ते, रीइम्बर्समेंट समाविष्ट आहे. तसेच, ग्रॅज्युएटी, ॲनुअल व्हेरिएबल पे, वार्षिक बोनस जसे प्रॉडक्टचा समावेश केला जातो. CTC ची रक्कम कर्मचार्यांच्या टेक होम सॅलरीच्या बरोबरीची नसते. CTC मध्ये अनेक घटक आहेत त्यामुळे ते वेगळे आहे. CTC = ग्रॉस सॅलरी + PF + ग्रॅज्युएटी
Panjabrao Dakh: आज पुन्हा “या जिल्ह्यांना” जोरदार पाऊस झोडपणार; पहा 30 ऑक्टोबर पर्यंतचा नवीन हवामान अंदाज
बेसिक सॅलरी :-
बेसिक सॅलरी हे कर्मचाऱ्याचे बेस इनकम असते. हे सर्व कर्मचार्यांच्या स्तरावर आधारित फिक्स केलं जातं. कर्मचार्यांच्या श्रेणीनुसार आणि तो ज्या उद्योगात काम करत आहे त्यानुसार ते बदलते.
ग्रॉस सॅलरी :-
PF Calculator New Wage Code : टॅक्स वजा न करता बेसिक सॅलरी आणि भत्ते जोडून जो पगार केला जातो त्याला ग्रॉस सॅलरी म्हणतात. यामध्ये बोनस, ओव्हरटाईम वेतन, सुट्टीचा पगार आणि इतर वस्तुनिष्ठ भत्ते यांचा समावेश होतो.
एकूण सॅलरी = बेसिक सॅलरी + HRA+ इतर भत्ते
नेट सॅलरी :-
निव्वळ पगाराला टेक होम सॅलरी असेही म्हणतात. टॅक्स वजा केल्यावर जो पगार होतो त्याला निव्वळ उत्पन्न म्हणतात.
निव्वळ पगार = बेसिक सॅलरी + एचआरए + भत्ते – आयकर – EPF – Professional Tax