Take a fresh look at your lifestyle.

महाआवास घरकुल योजना 2.0 : 2022 । उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा ; 2022-23 मध्ये 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट…

0

शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शासनाने 20 नोव्हेंबर 2020 रोजी महाआवास योजना ग्रामीण (MAY-G) राज्यातील ग्रामीण लोकांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून आत्तापर्यंत 5 लाख घरे बांधले आहे. परंतु कोरोना काळामुळे विलंब आल्यानंतर आता पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 मध्ये उपमुख्यमंत्री, तथा वित्त व नियोजन मंत्री    अजितदादा पवार यांनी येणाऱ्या काळात महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत राज्यात 5 लाख घरे बांधण्यासाठी सुरुवात करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

आता आपण महाआवास अभियान योजना 2.0 अभियाना अंतर्गत ऑनलाइन नोंदणी फॉर्म कसा भरायचा, अर्ज कुठे करायचा, पात्रता, आवश्यक कागदपत्रांची यादी पाहू शकता कागदपत्रे,

राज्य सरकारच्या या महाआवास योजना ग्रामीण MAY-G – 2.0 अंतर्गत मार्च अखेरपर्यंत ग्रामीण भागातील लोकांसाठी 6 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून 5 लाख घरे बांधली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागासाठी महाआवास योजना ग्रामीण ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर सर्व इच्छुक अर्जदार महाआवास योजना ग्रामीण ऑनलाइन अर्ज / नोंदणी फॉर्म भरू शकतात…

महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब लोकांसाठी ऑनलाइन कार्यक्रम (व्हर्च्युअल मीटिंग) द्वारे महा आवास योजना ग्रामीण (MAYG) : 2.0 2022 सुरू केली आहे.

महाआवास योजना ग्रामीण (MAYG मोहीम) च्या अधिकृत शुभारंभाबद्दल सीएमओ उद्धव ठाकरे यांनी यांनी ट्विट केलं आहे आणि म्हटले आहे की, ग्रामीण भागात सुमारे 5 लाख घरे, बांधणीचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सर्वानी सहभाग घ्यावा अन् ही मोहीम यशस्वी व्हावी, अशी आ शा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

महाआवास योजना ग्रामीण, पात्रता :-

अपंग सदस्य असलेली घरे योजनेसाठी पात्र आहेत.
स्वतःच्या नावावर शेतजमीन नसावी.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक प्रवर्गातील कुटुंबे.
ज्या कुटुंबांकडे कोणतही चार चाकी वाहन नाही, शेती उपकरणे किंवा मासेमारीची नाव नाही.
अशी कुटुंबे ज्यांना राहायला घर नसून ते कच्च्या घरात राहतात.
19 ते 59 वयोगटातील कोणताही पुरुष किंवा स्त्री
शारीरिकदृष्ट्या सक्षम सदस्य नसलेली कुटुंबे.
साक्षर प्रौढ नसलेली कुटुंबे ज्यांचे वय किमान 25 वर्षे असावं.
₹ 50,000 किंवा त्याहून अधिक मर्यादेसह किसान क्रेडिट कार्ड असलेल्या व्यक्ती.

MAYG योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
बँक पासबुक
रहिवासी दाखला
गृहनिर्माण संस्थेकडून एनओसी
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे कच्चे घर असल्याचे प्रतिज्ञापत्र.
मनरेगा-नोंदणीकृत लाभार्थी जॉब कार्ड क्रमांक
अपंग असेल तर अपंगत्वाचा पुरावा..

महा आवास योजना ग्रामीण 2.0 : 2022 :- लाभ…

सर्वसाधारण क्षेत्रासाठी 1 लाख 20 हजार रुपये अर्थसहाय्य
डोंगराळ, नक्षलग्रस्त भागासाठी एक लाख 30 हजार अर्थसहाय्य
मनरेगा अंतर्गत 90 दिवसांची अकुशल मजुरी 18 हजार रुपये
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12 हजार रुपये अनुदान..
या मार्फत अनुक्रमे दीड लाख व 1 लाख 60 हजार रुपये अर्थसहाय्य घरकुल बांधकामासाठी देण्यात येते.
यातून किमान 269 चौरस फूट आकाराचे घर बांधणे अपेक्षित आहे.

महा आवास योजना ग्रामीण 2022 अर्ज कसा कराल !

सध्या या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व्हेबसाइट उपलब्ध नाहीये .यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित प्रभाग किंवा ग्रामपंचायतीला भेट देऊन MAYG योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. संपूर्ण कागदपत्रांची जुळवा -जुळव करून तुम्ही गावातील सरपंच व ग्रामसेवकांना भेटून आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

Leave A Reply

Your email address will not be published.