अहमदनगरला 930 तर पुणे जिल्ह्यासाठी 600 शेततळ्यांचे टार्गेट, मिळणार ₹ 75,000 अनुदान; ऑनलाईन अर्ज सुरु, पहा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस..
राज्य शासनाने कोविड काळात निधीचे कारण समोर करून बंद केलेली ‘मागेल त्याला शेततळे योजना’ ही ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ या नावाने पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे पावणेपाचशे शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट्ये आहे. यासाठी शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
तसेच 60 गुंठ्यांपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे व पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. जिल्ह्यात सुमारे पाच हजारांपर्यंत वैयक्ति व सामुहिक शेततळे खोदण्यात आली आहेत.
दरम्यान, मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने गत दोन वर्षांपासून बंद केली होती. योजना बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना इच्छा असतानाही शेततळे खोदता आले नाही. त्यामुळे सदर योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती.
गत काही वर्षांपासून शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून फळबागांची लागवड करून त्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळे शेततळे खोदण्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली.
हे लक्षात घेता शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना नव्या स्वरुपात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना नावाने सुरू केली आहे. या माध्यमातून राज्यात सुमारे साडेतेरा हजार शेततळे खोदली जाणार आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक 930 शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेतून पूर्वी शेततळे खोदण्यासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होतं, परंतु महाविकास आघाडी यात बदल करत 75 हजार रुपयापर्यंत अनुदान वाढवलं. शिवाय सदर अनुदान थेट विभागीय आयुक्त स्तरावरून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे.
यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010, अनुसूचित जमातीसाठी 770, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 11 हजार 720 लक्ष्यांक आहे. परंतु या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना MahaDBT या सरकारच्या पोर्ट्वल्वर अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रोसेस खाली दिली आहे.
शेत तळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.
2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर ‘अर्ज करा’ ऑप्शनमध्ये यावर क्लिक करा.
3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘सिंचन साधने व सुविधा’ समोर ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला success दाखवलं जाईल यावर तुम्ही OK वर क्लिक करा.
5) यानंतर तुम्हाला सिंचन स्रोत निवडावा लागेल, यामध्ये तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे / यापैकी तुम्ही सिंचन स्रोत निवडा…
6) यानंतर तुम्हाला ऊर्जा स्रोत निवडावा लागेल. जसे की, वीज कनेक्शन / सौर ऊर्जा चलित पपं / डिझेल चलित पपं यापैकी ऊर्जा स्रोत निवडा.
7) यानंतर तुम्हाला ‘सिंचन सुविधा व उपकरणे’ जसे की, इंजिन / इलेक्ट्रिक मोटार -सिंचन पपं / उपसा सिंचन / ठिबक / तुषार / यापैकी एक बाब निवडा.
8) यानंतर तुम्ही वापरात असलेलं उपकरण किती HP चं आहे ते निवडून त्याची संख्या लिहा..
9) यानंतर तुम्हाला ही बाब successfully ऍड झालेली दिसेल.
10) यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठावर जावं लागेल. मुख्यपृष्ठावर जणू पुन्हा अर्ज करा वर क्लिक करा. ‘सिंचन साधने व सुविधा’ या ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.
11) यावर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा अर्ज खुलेल.
12) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका, गट/ सर्व्हे नंबर मुख्य घटक तपशील मध्ये ‘सिंचन साधने व सुविधा‘ निवडा, यानंतर बाब निवडामध्ये ‘वैयक्तिक शेततळे’ यावर क्लिक करा. त्यानंतर उपघटक मध्ये
तुम्हाला कोणता प्रकार हवाय तो निवडा. यानंतर ‘साईझ निवडा’ 30X30X3 / 15X15X3 / 20X15X3 यापैकी एक ऑप्शन निवड आणि बाब जतन करा.
13) जतन केल्यानंतर तुम्हाला success झालं म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल.
14) त्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठ दाखवलं जाईल. आता पुन्हा तुम्हाला उजव्या साईडला ‘अर्ज सादर करा’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही, बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व करा.
15) यानंतर तुम्हाला ‘पहा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला असेल ते सांगळे अर्ज दिसेल त्याला प्राधान्य क्रम द्या.आणि ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.
16) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.
17) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…
अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल…
यानंतर जे लाभार्थी पात्र होतील त्यांना मॅसेजद्वारे कळवलं जाईल, यानंतर लाभार्थ्यांची माहिती तालुका कृषी अधिकारी घेतील. लाभार्थी अनुदानास पात्र असल्याची खात्री झाल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यारंभ आदेश न पूर्वसंमती पत्र देतील. प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर संनियंत्रण समिती काम करणार आहे.
शेत तळ्यासाठी किती मिळेल अनुदान :-
30X30X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान मिळेल.
15X15X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 35 ते 50 हजारापर्यंत अनुदान मिळेल.
तर 20X15X3 आकारमानाच्या शेततळ्यासाठी ही 50 हजारापर्यंत अनुदान मिळेल.
जिल्हानिहाय पहा शेततळ्यांची संख्या…
ठाणे: 125, पालघर: 120, रायगड : 210, रत्नागिरी : 210, सिंधुदुर्ग : 190, नाशिक : 605, धुळे : 260, नंदुरबार 165, जळगाव : 590, अहमदनगर : 930, पुणे : 600, सोलापुर: 690 सातारा : 600, सांगली : 475, कोल्हापुर : 480, औरंगाबाद : 640, जालना : 470, बीड : 630, लातूर : 395, उस्मानाबाद : 390, नांदेड़ : 570, परभणी : 420, हिंगोली : 280, बुलडाणा : 500, अकोला : 340, वाशिम : 255, अमरावती : 500, यवतमाळ : 500, वर्धा : 220, नागपुर : 325, भंडारा : 180, गोंदिया : 185, चंद्रपुर : 310, गडचिरोली: 140