कर्मचाऱ्यांनो, 8Pay Commission विसरा । आता पगारवाढीसाठी वापरणार अरुण जेटलींचा ‘हा’ फॉर्म्युला ; फिटमेंट फॅक्टरही होणार रद्द…
शेतीशिवार टीम : 7th Pay Commission latest updates : केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का देणारी वाईट बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरल्या जाणार्या वेतन आयोगाची पद्धत बदलणार आहे. पुढील वेतन आयोग म्हणजे (8th Pay Commission) येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
म्हणजे पुढच्या वेळेपासून पगार वाढवण्यासाठी नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार, नवीन प्रणाली 2024 मध्ये लागू केली जाऊ शकते. या अंतर्गत केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी 10 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच, फिटमेंट फॅक्टरची सिस्टिम देखील रद्द केली जाणार आहे.
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दरवर्षी वाढणार पगार :-
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात पुढील वेतन आयोग लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी 10 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. त्यांची पगारवाढदरवर्षी वाढत राहावी, अशी व्यवस्था करावी लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की, जर 8 वा वेतन आयोग आला नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे सूत्र कोणतं असेल ते समजून घेउया…
अरुण जेटलींच्या फॉर्म्युल्याचा होणार वापर :-
2016 मध्ये दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जात असल्याचे सांगितले होते. पण, आता वेतन आयोगाशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचा विचार करायला हवा. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना न्यायमूर्ती माथूर यांनी असेही म्हटले होते की, वेतन आयोगाची व्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. ते फक्त पगार वाढवण्यासाठीच वापरले पाहिजे असे नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार लवकरच अरुण जेटलींचा फॉर्म्युला वापरून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवू शकते…
परफॉर्मेंस लिंक्ड इंक्रीमेंट :-
पुढील वेतन आयोग येणार नसल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. आता पगारवाढीचे प्रमाण कोणत्या सूत्रानुसार ठरवता येईल, याची चर्चा आहे. कर्मचार्यांचा पगार त्यांच्या कामगिरीशी निगडीत वाढीनुसार (Performance linked increment) दरवर्षी वाढला पाहिजे, यावर अर्थ मंत्रालय काम करत आहे.
‘ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टीम’ हा आहे तो फॉर्मुला :-
68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांसाठी सरकार अशी प्रणाली तयार करत आहे, जेव्हा 50% DA झाल्यास पगारात ऑटोमॅटिक रिव्हिजन होईल. या प्रणालीला ‘ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टम’ असे नाव दिलं जाऊ शकतं.
हेच सूत्र अरुण जेटलींना अमलात आणायचे होते. केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात स्वतः रिव्हिजन व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केलं होते. तसेच विभागाला कळायला हवे की, त्यांच्या कर्मचार्यांची कामगिरी कशी आहे आणि त्यांना किती महागाई भत्ता मिळतो मात्र, सरकारच्या बाजूने अंतिम निर्णय येईपर्यंत याबाबत स्पष्टपणे काहीही सांगणे जरा घाईचे होईल.
फिटमेंट फॅक्टरची व्यवस्थाही येणार संपुष्टात :-
केंद्रीय कर्मचार्यांच्या पगार सुधारणाबाबत नवा फॉर्म्युला आल्यावर त्यात फिटमेंट फॅक्टरची व्यवस्थाही संपुष्टात येईल. म्हणजे आता फिटमेंट फॅक्टरही वाढणार नाही. जी काही प्रणाली लागू असेल, त्यात केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या पातळीवरच वाढ होईल. जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, आता फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पगारवाढीचा नवा फॉर्म्युला आणला की फिटमेंट फॅक्टरची गरज भासणार नाही.