Take a fresh look at your lifestyle.

शासनाची शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा ; 50 हजार रुपये मिळवण्याची मोठी संधी ; पहा पात्रता, कागदपत्रे ; अर्ज प्रोसेस…

0

शेतीशिवार टीम : 10 ऑगस्ट 2022 :- Crop Competition Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे.. राज्य सरकारच्या विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांचा राज्य सरकारतर्फे बक्षिसे देऊन गौरव केला जाणार आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या बातमीची सविस्तर माहिती जाणून घेऊया…

शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवित असते. परंतु, आता शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या प्रयोग केल्या जातात. अशा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर, शेतकऱ्यांना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेत खरीप हंगामातील 11 पिकांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, नाचणी, उडीद, मूग या पिकांचा समावेश आहे. या दिलेल्या पिकांचे कमी खर्चात जास्तीत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. (Crop Competition Farmers)

अशी असेल पिक स्पर्धा :-

प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक सर्वसाधारण गटासाठी 10 शेतकरी, तर आदिवासी गटासाठी 5 शेतकरी असेल. शेतकऱ्याने कमीत कमी 10 आर क्षेत्रावर पिकाची सलग पेरणी केलेली असावी. संबंधित पिकांची स्पर्धा कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणीसाठी किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 ठेवण्यात आली.

या स्पर्धेत शेतकऱ्यांना एका वेळी एकापेक्षा अधिक पिकांच्या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये आहे. स्पर्धकांनी नमुना अर्ज भरून, प्रवेश फी, सातबारा व 8-अ उतारा व जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडून तालुका / जिल्हा कृषी कार्यालयात 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

असे होणार बक्षीस वितरणाचे वाटप :-

तालुका पातळी :-

प्रथम क्रमांक :- 5 हजार रुपये
द्वितीय क्रमांक :- 3 हजार रुपये
तृतीय क्रमांक :- 2 हजार रुपये

जिल्हा पातळी :-

प्रथम क्रमांक :- 10 हजार रुपये
द्वितीय क्रमांक :- 7 हजार रुपये
तृतीय क्रमांक :- 5 हजार रुपये

विभागीय पातळी :-

प्रथम क्रमांक :- 25 हजार रुपये
द्वितीय क्रमांक :- 20 हजार रुपये
तृतीय क्रमांक :- 15 हजार रुपये

राज्य पातळी :-

प्रथम क्रमांक :- 50 हजार रुपये
द्वितीय क्रमांक :- 40 हजार रुपये
तृतीय क्रमांक :- 30 हजार रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.