BREAKING : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून 20 मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर ; पहा कुणाला मिळालं कोणतं खातं ?
शेतीशिवार टीम : 9 ऑगस्ट 2022 :- बंडखोर – भाजप सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत आज मंगळवारी सकाळी 11 वाजता पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.
परंतु, मंत्र्यांच्या खात्यांचा निर्णय अद्याप झालेला नव्हता. मंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे वाटप लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र आता आज रात्री लगेचच खाते वाटपही जाहीर करण्यात आले आहेत.
भाजपने यामध्ये गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेलं नगरविकास खातंचं कायम ठेवण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राधाकृष्ण विखे – पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रसाद लोढा, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित
तर शिवसेना बंडखोर आमदारांमध्ये गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे, तान्हाजी सावंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न केला असून दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी 9 असे एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.
पहिल्या टप्प्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत अपक्ष आमदार आणि विधान परिषद सदस्यांचा समावेश केला नसून प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि शिंदे यांना समर्थन देणारे अपक्ष आमदार यांनाही मंत्रीपदासाठी थांबावं लागलं आहे. बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असतानाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
तर TET घोटाळ्यातील प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून त्यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे उघड झाल्याने सत्तार यांच्या मंत्रिमंडळ समावेशाविषयी संभ्रम निर्माण झाला होता परंतु अब्दुल सत्तार यांनी अख्खी रात्र जागून रात्रीच शिक्षण विभागाकडून क्लीनचिट मिळवली.
20 मंत्र्यांना आज रात्री जाहीर करण्यात आलेलं खातेवाटप :-
राजभवन सोहळ्यात शपथ घेतलेल्या 18 आमदारांपैकी 17 आमदार यापूर्वी मंत्री होते. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रीपद मिळालेले नाही…
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
राधाकृष्ण विखे पाटील (63) हे अहमदनगर जिल्ह्यातून सहा वेळा आमदार आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना 2014-19 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते पण 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली.
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
नव्या मंत्र्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (63) यांचाही समावेश आहे. पाटील हे दोन वेळा नगरसेवक आणि पश्चिम महाराष्ट्राचे आमदार आहेत. ते 2014-19 दरम्यान महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री होते.
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
सुधीर मुनगंटीवार (60) हे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014-19 मध्ये ते वित्त आणि वनमंत्री होते.
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
मंगल प्रभात लोढा (66) हे पाच वेळा मुंबईतून भाजपचे आमदार राहिले आहेत. ते पक्षाच्या मुंबई युनिटचे अध्यक्षही आहेत. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक लोढा यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची मालमत्ता 441 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते आणि ते राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
भाजपचे रवींद्र चव्हाण (51) हे ठाणे जिल्ह्यातून तीन वेळा आमदार आहेत. 2014-19 मध्ये ते राज्यमंत्री होते..
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (67) हे तीन वेळा शिवसेनेचे आमदार आहेत. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून यापूर्वी ते राज्यमंत्रीही होते.
अतुल सावे :- आरोग्य
अतुल सावे (60) हे मराठवाड्यातून (औरंगाबाद जिल्हा) दोन वेळा भाजपचे आमदार आहेत. त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
गिरीश महाजन :- जलसंपदा
गिरीश महाजन (62) हे उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते असून त्यांनी सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
विजयकुमार गावित :- आदिवासी विकास
विजयकुमार गावित (67) यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ते पाच वेळा आमदार झाले आहेत. तो मूळचा उत्तर महाराष्ट्रातील नंदरबार जिल्ह्यातील आहे.
सुरेश खाडे :-
सुरेश खाडे (64) हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून दोन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. ते राज्यमंत्री आहेत.
गुलाबराव पाटील :- पाणीपुरवठा
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेले गुलाबराव पाटील (56) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री होते.
उदय सामंत :- उद्योग
उदय सामंत (46) हे रत्नागिरी जिल्ह्यातून चार वेळा शिवसेनेचे आमदार आहेत. हे एकमेव तरुण मंत्री 50 वयाच्या आतील असून महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये ते तंत्र व उच्चशिक्षण मंत्री होते.
संदिपान भुमरे :- रोजगार हमी
पाच वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे संदिपान भुमरे (59) हे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. मागील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.
दादा भुसे :- कृषी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे चार वेळा आमदार असलेले दादा भुसे (58) हे महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये कृषीमंत्री होते.
शंभूराज देसाई :- उत्पादन शुल्क
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन वेळा आमदार असलेले शंभूराज देसाई (55) हे महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते.
संजय राठोड :- ग्रामविकास
संजय राठोड (51) हे यवतमाळ जिल्ह्यातून चार वेळा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वनमंत्री होते आणि भाजपने पूजा चव्हाण नावाच्या महिलेच्या आत्महत्येचा आरोप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
तानाजी सावंत :- उच्च व तंत्रशिक्षण
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (58) हे विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा सावंत यांनी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं होतं.
अब्दुल सत्तार :- अल्पसंख्याक विकास
अब्दुल सत्तार (54) हे मराठवाड्यातून तीन वेळा आमदार आहेत. पहिल्या दोन टर्ममध्ये ते काँग्रेससोबत होते आणि 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळ्याप्रकरणी सत्तार यांच्याविरोधात चौकशीची मागणी विरोधकांकडून होत आहे. एक दिवस आधी, अंमलबजावणी संचालनालयाने टीईटी घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एक मुलगा टीईटी 2019-20 च्या यादीत आला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांच्या एकाही मुलाने परीक्षाही दिली नव्हती.
दीपक केसरकर :- पर्यावरण, पर्यटन
शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (67) हे तीन वेळा शिवसेनेचे आमदार आहेत. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून यापूर्वी ते राज्यमंत्रीही होते.