7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, मार्च 2023 पासून पगार 90,000 रुपयांनी वाढणार, पहा कॅल्क्युलेशन..
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मार्चमध्ये होळीच्या आसपास त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. मार्च महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास सरकार मान्यता देणार आहे. ही घोषणा जानेवारी 2023 साठी असणार आहे.
डिसेंबर 2022 च्या AICPI आकड्यांनंतर DA किती वाढणार हे ठरवलं जाणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे. सध्याचे आकडे बघितले तर येत्या काही दिवसांत DA 41% पोहचू शकतो.
41 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो महागाई भत्ता..
कामगार मंत्रालयाच्या मते, नोव्हेंबर 2022 मध्ये औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AI CPI-IW) 132.5 अंकांवर आहे. डिसेंबर महिन्याचा आकडा 31 जानेवारीला येईल. तो स्थिर राहिल्यास 3% ची वाढ निश्चित आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 41 टक्के करण्यात आल्याचे समजलं आहे.
पगार 90 हजारापर्यंत वाढणार..
तज्ज्ञांच्या मते, 7व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या सहा महिन्यांत महागाईचा बोजा खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत मोठा दिलासा मिळणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा 30 हजार रुपये असेल तर त्यामुळे त्याचा पगार दरमहा 900 रुपयांनी वाढणार असून एकूण पगार वार्षिक आधारावर 10,800 रुपयांनी वाढेल. कॅबिनेट सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पगारात दरमहा 7500 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच कमाल मूळ वेतन दरमहा अडीच लाख रुपये असल्यास वार्षिक 90,000 रुपयांचा डीए हा मोठा फायदा असल्याचे दिसते.
7 वा वेतन आयोग : महागाई भत्ता कमी वाढण्याची शक्यता आहे का ?
वास्तविक, गेल्या दोन महिन्यांत किरकोळ महागाईचा दर खूपच कमी होताना दिसत आहे. सीपीआय डिसेंबरमध्ये एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत AICPI निर्देशांक वाढवणे कठीण आहे. 4% DA वाढीसाठी, निर्देशांकात 1 पॉइंटची वाढ आवश्यक आहे. याबाबत फारशी आशा नाही. कारण, निर्देशांक महागाईच्या प्रमाणातच वाढतो. अशा परिस्थितीत 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे केवळ 3% DA वाढेल असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता हा असा पैसा आहे, जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च सुधारण्यासाठी दिला जातो.
7 वा वेतन आयोग : 6 महिन्यांमध्ये रिव्हाईस होतोय DA ?
कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. हा भत्ता सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिला जातो. महागाई भत्ता वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांना जगण्यात अडचण येऊ नये म्हणून महागाई भत्ता दिला जातो. सामान्यतः, जानेवारी आणि जुलैमध्ये दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता रिव्हाईस जातो.
कोणते सूत्र महागाई भत्ता वाढवते ?
महागाई भत्ता मूळ पगारावर मोजला जातो. महागाई भत्त्याच्या गणनेसाठी एक सूत्र निश्चित केलं आहे, जे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे निर्धारित केलं जातं. महागाई भत्ता टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांतील CPI ची सरासरी -115.76. आता जे येतं ते 115.76 ने भागलं जातं. येणार्या संख्येचा 100 ने गुणाकार केला जातो.