7th Pay Commission: सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला मिळणार गुड न्यूज, 46% DA सोबत 2 महिन्यांची थकबाकी तर पगारात थेट ₹ 26,000 वाढ..
केंद्रीय कर्मचाऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपणार असून त्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार असल्याचं कन्फर्म झालं आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. म्हणजेच सप्टेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंददायी ठरणार आहे.
सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीला मान्यता देऊ शकते. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते, असे सांगण्यात आलं आहे.
DA मध्ये चार टक्के वाढ निश्चित..
वास्तविक, केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढ आणि पेन्शनधारकांना महागाई राहत निश्चित आहे. जानेवारी ते जून या कालावधीतील महागाईच्या आकडेवारीनुसार ही वाढ निश्चित करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे बाकी असले तरी त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. (7th Pay Commission)
वाढीव DA जुलैपासून लागू होणार..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. DA मध्ये 4 टक्के वाढ जाहीर झाल्यानंतर तो 46 टक्क्यांवर जाईल. त्यात 3 टक्के वाढ झाली तर 45 टक्के होईल. AICPI निर्देशांकानुसार, जून 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांचा DA 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढीव डीए जुलैपासून लागू होईल. सप्टेंबरमध्ये घोषित केल्यावर कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांची DA थकबाकी देखील मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार ?
ज्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे त्यांना सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये प्रति महिना DA मिळतो. 46 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला दरमहा 8280 रुपये DA मिळेल. म्हणजेच दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वार्षिक आधारावर 8640 रुपयांची वाढ होणार आहे. कमाल मूळ वेतन 56,900 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या 23,898 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळत आहे. 46 टक्क्यांनंतर तो 26,174 रुपये प्रति महिना होईल म्हणजेच DA 2276 रुपयांनी वाढेल. वार्षिक आधारावर पाहिले तर DA मध्ये 27,312 रुपयांची वाढ होईल..