Mumbai Metro : आता अंधेरीहून मुंबई विमानतळ फक्त 8 मिनिटांत ! मेट्रो 7A चा बोगदा बांधण्यास सुरुवात, असा आहे Route Map..

0

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो 7A ला विमानतळाशी जोडण्याचे काम सुरू केले आहे. अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रोचा भूमिगत मार्ग (Underground way Metro) तयार करण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे.

3.442 किमी लांबीच्या मेट्रो मार्गापैकी 2.49 किमी भूमिगत असणार आहे. सुमारे 1 किमीचा मार्ग उन्नत होणार आहे. हवाई प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बोगद्याचे बांधकाम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. (Mumbai Metro  Line 7A)

एमएमआरमध्ये बांधण्यात येणाऱ्या मेट्रोची ही सर्वात लहान लाईन आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी या मेट्रो मार्गाचे काम चोवीस तास सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली.

मेट्रो मार्गात येणारे अडथळे दूर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या, प्रवाशांना अंधेरी किंवा विलेपार्ले रेल्वे स्थानकावरून देशांतर्गत टर्मिनलवर रस्त्याने पोहोचण्यासाठी सुमारे 20 ते 30 मिनिटे लागतात. मेट्रो 7A ची सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना 8 ते 10 मिनिटांत विमानतळावर पोहोचता येणार आहे.

5 लाइन्सनी होणार कनेक्ट..

मेट्रो 7A कॉरिडॉर मेट्रोच्या इतर पाच मार्गांना जोडेल. पाच मार्गिका जोडण्यात आल्याने मेट्रो प्रवाशांना वाहतुकीत न अडकता काही मिनिटांत शहर किंवा उपनगरात सहज पोहोचता येणार आहे. MMMRD नुसार, मेट्रो 7A मेट्रो 9, मेट्रो 7, मेट्रो 2A, मेट्रो 3 आणि प्रस्तावित मेट्रो 8 शी जोडली जाईल. मेट्रो 7A पूर्ण झाल्यामुळे हवाई प्रवाशांची सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.

समांतर प्लॅटफॉर्म..

कुलाबा – वांद्रे – सीप्झ दरम्यान बांधण्यात येत असलेल्या मेट्रो 3 कॉरिडॉरचे स्टेशनही विमानतळाशी जोडले जाणार आहे. मेट्रो 3 आणि मेट्रो 7A च्या प्रवाशांना एकमेकांच्या मार्गावरून सहज प्रवास करता यावा यासाठी दोन्ही कॉरिडॉरची स्थानके समांतर बांधली जातील.

जेणेकरुन मेट्रोचे प्रवासी सहज गाड्या बदलू शकतील. यासोबतच MMMRDA मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान सुमारे 35 किमी लांबीच्या मेट्रो 8 कॉरिडॉरच्या योजनेवरही काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.