शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईत भीतीचं वातावरण पसरलं आहे. 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेले 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आहे की नाही तपासण्यासाठी त्यांचे सॅम्पल जीनोम सीक्वेंसिंग साठी पाठवले आहेत.
याशिवाय जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी मिळाली आहे. या लोकांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेली ही लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडून दक्षता वाढवण्यात आली आहे.
आफ्रिकन देशांतून येणाऱ्या लोकांवर देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बारीक नजर ठेवली जात आहे. सर्वांची टेस्ट केली जात असून पॉझिटिव्ह आढळलेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. देशात ओमिक्रॉनचे व्हेरियंट दाखल झाल्याने दक्षता आणखी वाढली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. ही दोन्ही प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहेत. त्यापैकी एक वृद्ध व्यक्ती आहे तर दुसरा आरोग्य कर्मचारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्यादरम्यान देशात सलग दुस-या दिवशी नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे आणि लोक बरे होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 1 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.