सॅल्यूट । स्वतः नागाच्या तोंडात हवा भरून (CPR ) वाचवले प्राण ; व्हिडिओद्वारे पहा सत्यमचं अनोखं कृत्य !

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : सापाला पाहून त्याला पकडणं तर लांबचं दिसला तरी आपण पळ काढतो. अशा परिस्थितीत सापाला स्वतःच्या तोंडाला लावण्याची हिंमत कोणी करू शकतो का ? नक्कीच याचं उत्तर नाही असणं. परंतु छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील सत्यम द्विवेदी या सर्पमित्राने नुकताच असा एक पराक्रम केला आहे. तो पाहून सगळेच आश्चर्य चकित झाले आहे.

त्याने CPR (Cardio Pulmonary Resuscitation) देऊन मरणाऱ्या सापाचे प्राण वाचवलं आहे. सत्यमने सापाच्या तुटलेल्या तारेला आपल्या हवेने जोडून नवजीवन दिलं आहे. सत्यमने सीपीआर (CPR) देऊन सापाचे प्राण तर वाचवलेच, पण उपचार करून त्याला जंगलातही सोडलं आहे.

खरंतर, हृदयविकाराचा झटका आणि दम लागणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी CPR चा वापर केला जातो.

परंतु ज्यावेळी तो सॅप पकडण्यासाठी गेला तो येण्या आधीच तेथील लोकांनी त्या सापाला घायाळ केलं होतं. सापाला पाहून सत्यमचं मन हळहळलं. त्याने त्वरित जखमी अवस्थेत सापाला घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की, साप जगणे अशक्य आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

यावेळी त्यांने विचार केला की, सापालाही सीपीआर (CPR) का देऊ नये. मानवी जीव वाचवण्यासाठी हे तंत्र प्रभावी ठरलंय, तर ते सापांवरही काम करू शकते… मग काय, सत्यमने सापाला (CPR) दयायला सुरुवात केली अन पाहता – पाहता सापाचं शेपूट हलायला लागलं, त्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडलं…

Leave A Reply

Your email address will not be published.