मोक्ष’ प्राप्तीसाठी पती बनला ‘खूनी’ ; पत्नीसह 3 मुलांची केली निर्घृण हत्या आणि नंतर स्वतःलाही संपवलं…
शेतीशिवार टीम, 20 डिसेंबर 2021 :- हरियाणाच्या हिस्सारमधून एक अत्यंत भयावह घटना समोर आली आहे, एका व्यक्तीने पत्नी आणि 3 मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे, सुसाईड नोट मधून असं समोर आलं आहे की, मोक्ष’ प्राप्तीचा नादातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
असं सांगितलं जात आहे की, रमेश हिसार जिल्ह्यात ‘पर्यावरण प्रेमी’ म्हणून ओळखला जात होता, त्याने पत्नी आणि 3 मुलांची हत्या करून आत्महत्या केली आहे, त्याने घरात ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे . पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी अग्रोहा वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत,
असं सांगण्यात येत एके की, बारवाला रोडवर एक मृतदेह संशयास्पद अवस्थेत पडून असल्याची माहिती आग्रोहा पोलिसांना मिळाली, पोलिसांनी जाऊन पाहिले असता तो मृतदेह रमेशचा असल्याचे कळवलं. लोकांनी अन् पोलिसांनी रमेशच्या घरी जाऊन पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
तेथे असं दिसलं की, बेडवर आई-मुलाचे मृतदेह तर दुसऱ्या खाटेवर दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. चौघांच्या डोक्यात कुदळीने वार केले असून सगळीकडं रक्ताचा सडा पडला होता.
पोलिसांना घटनास्थळी सापडली डायरी :-
कुटुंबप्रमुख रमेश हा धार्मिक प्रवृत्तीचा होता. या खून आणि आत्महत्यांचे उद्दिष्ट ‘मोक्ष प्राप्ती’ होती असं त्यात नमूद होतं. रमेशला सेवानिवृत्ती घेऊन संन्यासी व्हायचं होतं, परंतु कुटुंबीयांच्या दबावामुळे तो तसं करू शकतं नव्हता…
रमेश ‘पर्यावरण प्रेमी’ म्हणूनही प्रसिद्ध…
मृत रमेशला 15 आणि 13 वर्षांच्या दोन मुली आणि 10 वर्षांचा मुलगा आहे. मयत रमेशचे अग्रोहा येथे दुकान होते, तिथे पेंटिंगचे काम करीत होता. रमेश हा’ पर्यावरण प्रेमी’ असल्याने गावात आढळणारे साप, विषारी प्राणी, विंचू, जंगली सरडे पकडून जंगलात सोडत असे.
या कामासाठी तो कधीही पैसे घेत नव्हता.. मात्र आता त्यांनी उचललेल्या पावलामुळे गावात खळबळ उडाली आहे. पर्यावरण रक्षणासाठीही ते काम करत असतं आणि तो एवढं धक्कादायक पाऊल उचलल्याने त्यांला ओळखणारे सर्वजण हैराण आणि अवाक झाले आहेत..