शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- रिटर्न्स देण्याच्या बाबतीत स्टॉक मार्केटमध्ये तोड नाही, जर तुम्ही कंपनीचे योग्य संशोधन, फंडामेंटल्स आणि मॅनेजमेंट चांगलं समजून घेतलं अन् पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता वाढते.
असाच एक शेयर वर्षभरात मल्टिबॅगर राहिला आहे तो म्हणजे बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables). कंपनीच्या शेअरने 34.95 ते 694 रुपयांची पातळी गाठली आहे. बोरोसिल रिन्युएबल्सचा (Borosil Renewables) शेयरने सुमारे 19 महिन्यांत ही पातळी गाठला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेयरने सुमारे 1900% रिटर्न्स दिले आहे. कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 658.35 रुपयांच्या पातळीवर ट्रेंड करत आहेत.
शेअर्समध्ये एका वर्षात 310 % वाढ :-
बोरोसिल रिन्युएबल्सचे (Borosil Renewables) शेअर्स 29 मे 2020 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 34.95 रुपयांवर बंद झाले. 17 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 694 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या 19 महिन्यांत कंपनीच्या शेयर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 1900% रिटर्न्स दिले आहे.
1 लाखांचे झाले तब्बल 20 लाख रुपये :-
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 29 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते अन् गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर सध्या ती रक्कम 20 लाख रुपये झाली असती. म्हणजेच गुंतवणूकदाराला थेट 19 लाख रुपयांचा फायदा झाला असता. जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी बोरोसिल रिन्युएबल्सच्या (Borosil Renewables) शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ती रक्कम सध्या 4.10 लाख रुपयांच्या जवळपास असती.