शेतीशिवार टीम, 22 डिसेंबर 2021 : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये एक माणूस भंगार साहित्यापासून बनवलेली चारचाकी (Modified Jeep) चालवत आहे. त्या व्यक्तीचे टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. खुद्द आनंद महिंद्रा या माणसाच्या टॅलेंटवर इतके खूश झाले की,त्यांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
ख रं तर महाराष्ट्रातील ही व्यक्ती असून त्यांच नाव दत्तात्रेय लोहार आहे. त्यांनी जंक मटेरिअलपासून मॉडिफाईड एक जीप बनवली आहे. तो कमी शिकूनही आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 60 हजार रुपये खर्च करून हे अनोखे वाहन बनवलं आहे.
यासाठी त्यांनी हिरो passion pro टू व्हीलरचं इंजिन वापरलं आहे अन् बॉडी cammander jeep चं तोंड लावलं आहे.जीप सारख्या दिसणार्या या वाहनाला किक स्टार्ट सिस्टीम मिळते,
आनंद महिंद्रा या नाविन्यामुळे खूप प्रभावित झाले, आणि त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “जरी हे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु मी आमच्या लोकांच्या कल्पकतेचे आणि ‘कमीपेक्षा जास्त’ क्षमतेचे कौतुक करणं मी कधीही थांबवणार नाही…
Local authorities will sooner or later stop him from plying the vehicle since it flouts regulations. I’ll personally offer him a Bolero in exchange. His creation can be displayed at MahindraResearchValley to inspire us, since ‘resourcefulness’ means doing more with less resources https://t.co/mibZTGjMPp
— anand mahindra (@anandmahindra) December 22, 2021
आनंद महिंद्रा माणसाच्या टॅलेंटवर इतके खूश होते की, त्यांनी त्याला जुन्या कारच्या बदल्यात एक नवी चमचमीत बोलेरो (Bolero) देणार आहे.