BREAKING : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा । सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाने राहणार सुरु…
शेती शिवार टीम,17 मे 2022 :- अद्यापही ऊसतोड न झालेल्या शेतामध्ये ऊस शिल्लक असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरू राहणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.
आपण पाहिलं तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवाने आपल्या ऊसाचा फड पेटवून स्वतः देखील आत्महत्या घेऊन बलिदान दिलं होतं. यामुळे आता राज्य सरकारला जग आली असून आता या शेतकऱ्याचं बलिदान अन्य शेतकऱ्यांसाठी सार्थक ठरलं आहे.
2020 – 2021 मध्ये राज्यामध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती, मात्र या तुलनेत 2021 – 22 मध्ये पाहिलं 13.67 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर काल 16 मे 2022 पर्यंत राज्यात 100 सहकारी व 99 खासगी असे 199 साखर कारखान्यांकडून 1300.62 लाख टन ऊस गाळप झालेलं आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळप झालं असलं तरी सध्या राज्यांमधील बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, अशा काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. यामुळे शेतकरी खूपच चिंतेत असून आपला ऊस जाईल की नाही या भीतीने टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत एक अतिशय महत्वाची बाईक पार पडली.
या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहे, तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवावे अशा प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी 1 मे नंतरच्या काळात झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टन याप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय देखील या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना आपला ऊस जाईल याची आता खात्री झाली आहे. साखर कारखाने आता हे गाळप होईपर्यंत बंद केले जाणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.