Electric Scooter : Odysse V2 लाँच केल्या 2 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर । फुल चार्ज करा अन् पळवा 150KM ; पहा, किंमत अन् फीचर्स !
शेती शिवार टीम,18 मे 2022 :- इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Odysse (Odyssey) ने देशात 2 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर Odysse V2 आणि V2+ लाँच केले आहेत. नवीन Odysse V2 आणि V2+ इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय बाजारात प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 75,000 रुपये आहे.
कंपनीचा दावा आहे की, या स्कूटर्स वॉटर – रेसिस्टेंट IP67 सर्टिफाइड बॅटरी पॅकसह सुसज्ज आहेत आणि एका पूर्ण चार्जवर 150 किमी अंतर कापण्याची क्षमता या मध्ये दिली आहे.
फीचर्स :-
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केल्या आहेत. या EVs मध्ये अँटी थेफ्ट लॉक, पॅसिव्ह बॅटरी कुलिंग, 12-इंचाचा फ्रंट टायर, LED लाईट्स, इतर अनेक फीचर्स आहेत. नवीन V2 आणि V2+ व्यतिरिक्त, Odysse च्या पोर्टफोलिओमध्ये E2go, Hawk+, Racer आणि Evoqis या चार इतर इलेक्ट्रिक दुचाकी आहेत. या वर्षी आणखी दोन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची कंपनीने योजना आखली आहे.
या घोषणेवर भाष्य करताना, Odysse चे CEO, Nemin Vora म्हणाले की, “Odyssey V2 आणि V2+ लाँच करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. भारत स्वच्छ गतिशीलतेकडे वाटचाल करत आहे आणि Odyssey सह आम्ही लोकांच्या वाटचालीत बदल करत आहोत.
आम्हाला फरक करायचा आहे. नवीन लाँच केलेली स्कूटर ही आमच्या प्रॉडक्शनच्या पोर्टफोलिओला बळकट करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे जिथे इलेक्ट्रिक स्कूटर्सना उत्साहवर्धकपणे उच्च मागणी आहे…
ते पुढे पुढे म्हणाले की, 150 किमी मायलेजसह Odyssey V2+ ग्राहकांना नवे कलर आणि शानदार फीचर्स प्रदान करेल, त्याचबरोबर रेंजची चिंता ही दूर करेल. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, ओडिसीने आपल्या अहमदाबाद प्लांट व्यतिरिक्त मुंबई आणि हैदराबाद येथे प्रॉडक्शन सुविधा सुरू केल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस 100 हून अधिक डीलरशिप करण्याची कंपनीची योजना आहे…