शेतीशिवार टीम, 17 जून 2022 : अग्निपथ योजनेबाबत (Agneepath Scheme) देशभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. पहिली अग्नीची भरती केव्हा निघणार याबाबत त्यांनी महत्वाचं अपडेट दिलं आहे.

येत्या 48 तासांतच अग्नीवर भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जारी करण्यात येणार असून ही अधिसूचना लवकरच भारतीय लष्कराच्या http://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जारी केली करण्यात येणार आहे. या वर्षीचं येत्या डिसेंबरपर्यंतचं लष्कराला पहिला अग्निवीर मिळणार असून पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ते तिन्ही सेवांमध्ये ऑपरेशनल आणि नॉन-ऑपरेशनल तैनातीसाठी तैनात केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, ‘लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याची अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी केली जाईल. यानंतर, नोंदणी, भरती, शर्यती इत्यादींचे वेळापत्रक सैन्याकडून जारी केलं जाणार आहे.

ते म्हणाले की, अग्निवीरांच्या भरती प्रशिक्षण केंद्रांचा संबंध आहे, या वर्षाच्या अखेरीस पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होईल. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या विरोधाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, तरुणांना या योनेबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. एकदा त्यांचा गैरसमज दूर झाल्यानंतर ते निषेध करणार नाहीत.

लष्करातील ‘अग्निपथ योजने’मधील भरतीच्या नव्या योजनेला देशात शुक्रवारीही विरोध सुरूच आहे. त्याचा परिणाम बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अधिक दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे गाड्यांना लक्ष्य केलं आहे.

विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे अनेक प्रवासी गाड्यांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी, विशेषतः बिहारमध्ये आंदोलकांनी रेल्वे मालमत्तेचे नुकसान केलं आहे आणि अनेक गाड्या पेटवल्या आहेत. अशा स्थितीत राज्यातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या निदर्शनामुळे 200 हून अधिक रेल्वे सेवा प्रभावित झाल्या आहेत. तसेच, तेलंगणा आणि बिहारमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरावर हल्ला :- 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या बेतिया येथील घरावरही विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरावर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *