महा अपडेट टीम,19 जून 2022 : 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुण मुले सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करू लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष स्पर्धा परीक्षकांकडे वळतं, मग त्यामध्ये यूपीएससी / एमपीएससी या अवघड परीक्षा पास करणं त्यांचं ध्येय बनतं.
उमेदवारांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, स्पर्धा कोणतीही असो. तयारीसाठी, अभ्यासक्रमानंतर, जास्तीत जास्त लक्ष सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे.
कारण लेखी परीक्षा असो किंवा उमेदवारांची मुलाखत असो, येथे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यातील काही प्रश्न अवघड असतात तर काही प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आपण सामान्य ज्ञानाचे असेच काही प्रश्न जाणून घेणार आहोत…
प्रश्न : असा कोणता देश आहे जिथं कैदी आयात केले जातात ?
उत्तर : नेदरलँड
प्रश्न : पाण्याच्या बॉटलवर लिहिलेली एक्सपायरी डेट पाणी की बॉटल यापैकी कशासाठी असते ?
उत्तर : बाटली.
कायदेशीरदृष्ट्या, बाटलीबंद पाण्यावर एक्सपायरी डेट लिहिण्याची आवश्यकता नसते. परंतु, सावधगिरी म्हणून, बाटल्यांवर प्रॉडक्शन डेटपासून दोन वर्षांपर्यंतची एक्सपायरी डेट दिलेली असते. कारण, ठराविक कालावधीनंतर प्लास्टिक बाटलीबंद पाण्यात विरघळू शकतं.
प्रश्न : असा कोणता प्राणी, ज्याचे हृदयाचे ठोके 2 मैल दूरवरून ऐकू येतात ?
उत्तर : ब्लू व्हेल.
प्रश्न : जगातील अशी कोणती नदी आहे, ज्याच्या पाण्याचा रंग लाल आहे ?
उत्तर : स्पेनची रिओ टिंटो नदी. (Rio Tinto)
प्रश्न : चंद्रावर ‘गोल्फ’ खेळणारा एस्ट्रोनॉट कोण होता ?
उत्तर : सुमारे 51 वर्षांपूर्वी म्हणजेच 1971 मध्ये या दिवशी मानवाने चंद्रावर गोल्फ खेळला होता. हा पराक्रम करणारा माणूस म्हणजे अंतराळवीर ॲलन शेफर्ड. तो अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मून मिशन अपोलो-14 च्या क्रूचा भाग होता.
प्रश्न : असा कोणता देश आहे तिथे खारुताईंना येणं – जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे ?
उत्तर : नेदरलँड.
प्रश्न : असा कोणता देश आहे तिथे आंबट मध आढळतो ?
उत्तर : ब्राझील.
प्रश्न : भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात राज्य विधानसभेच्या निवडणुकांची तरतूद आहे ?
उत्तर : कलम 170.
प्रश्न : जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतं ?
उत्तर : भारताचे राष्ट्रपती.
प्रश्न : भारतातील कृषी-पर्यावरणीय क्षेत्रांची संख्या किती आहे ?
उत्तर :16.
प्रश्न : ‘पद्मावत’ ही कोणाची रचना आहे?
उत्तर : मलिक मुहम्मद जायसी.
प्रश्न : जगातील सर्वात लांब रिफ्ट व्हॅली कोणत्या खंडात आहे?
उत्तर : अफ्रीका.
प्रश्न :जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट आहे
उत्तर : गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे 12.95 लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरलं आहे.
प्रश्न : वातावरणात कोणता वायू सर्वाधिक आढळतो ?
उत्तर : नायट्रोजन.
प्रश्न: जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश कोणता ?
उत्तर: चीन.
प्रश्न : ‘गेसर’ हे कोणत्या बेटाचे महान गिझर आहे ?
उत्तर : आइसलँड