शेतीशिवार टीम, 20 जून 2022 : Agnipath Recruitment 2022 : भारतीय सैन्याने सैन्य भरती अग्निपथच्या नवीन योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अग्निवीर भरती रॅलीचे नोटिफिकेशन जारी केलं आहे. अग्निवीर भरती रॅली भरतीसाठी नोंदणी जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. भारतीय लष्कराच्या नोटिफिकेशननुसार, 8वी आणि 10वी उत्तीर्ण युवकही यामध्ये अर्ज करू शकतात. यासोबतच ‘अग्नवीर’ ही वेगळी रँक असणार आहे,असं नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आलं आहे.
ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असून ज्यामध्ये 4 वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये कोणतीही पेन्शन किंवा ग्रॅज्युएटीचा लाभ दिला जाणार नाही. याशिवाय जवानां प्रमाणे अग्निवीरांना कॅन्टीनची सुविधाही दिली जाणार नसल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अग्निवीर भरती रॅली मध्ये ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया जुलै 2022 पासून सुरू होणार असून ‘या’ पदांसाठी केली जाणार भरती :-
अग्नवीर जनरल ड्युटी
अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन / एम्यूनेशन)
अग्निवीर क्लर्क / स्टोअरकीपर टेक्निकल
अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास
अग्निवीर ट्रेडसमन आठवी पास
पात्रतेनुसार भरता येणार फॉर्म :-
अग्निवीर जनरल ड्युटीच्या पदासाठी उमेदवार किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.
अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन / अॅम्युनिशन) पदासाठी उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
अग्निवीर क्लर्क / स्टोअरकीपर टेक्निकल या पदासाठी उमेदवारांनी विज्ञान स्ट्रीममध्ये 12 वी इंग्रजीत किमान 60% गुणांसह गणितात 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
अग्निवीर ट्रेड्समन पदासाठी 10वी आणि 8वी साठी वेगळी भरती केली जाईल. या भरतीसाठी सर्व विषयात 33% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याच वेळी, या पदासाठी वयोमर्यादा 17.5 वर्षांवरून 23 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाणार भरती :-
अग्निवीर भरती रॅली भरतीसाठी जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सर्व भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. ही भरती 3 टप्प्यात भरती होणार आहे.
प्रथम फिजीकल टेस्ट, त्यानंतर मेडिकल टेस्ट आणि तिसऱ्या टप्प्यात लेखी चाचणी होईल. दुसरीकडे, एनसीसी कॅडेट्सना (NCC cadets) लेखी परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जाणार आहे. यासोबतच तुम्ही स्पोर्ट सर्टिफिकेट जोडून वेगळे बोनस नंबर मिळवू शकता…
किती मिळेल पगार :-
अधिसूचनेनुसार, अग्निवीर रिक्रुटमेंट रॅलीमधील उमेदवारांची भरती 4 वर्षांसाठी असणार आहे. या दरम्यान त्यांना दरवर्षी 30 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. नोकरीच्या पहिल्या वर्षी 30,000/- पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी 33,000/- पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी 36,500/- पगार आणि भत्ते आणि शेवटच्या वर्षी 40,000/- पगार आणि भत्ते दिले जाणार आहे.