Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, ‘या’ दिवशी जमा होणार ₹ 4,000 हप्ता, आता फक्त 2 मिनिटांत मोबाइलवर करा Face KYC..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण नियोजनासाठी राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून ई – केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बैंक) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजन करण्याबाबत सूचना आहेत.तरी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी तत्काळ आपली ई – केवायसी करून घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राव्दारे लाभार्थीची ई – केवायसी करणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे, केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप मोबाइलवर चेहरा प्रमाणीकरण व्दारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई – केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई – केवायसी प्रमाणिकरणासह इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई – केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे,

मोबाइलद्वारे ई – केवायसी प्रमाणिकरण असे करा..

लिंक – PMKISAN मोबाईल मॅप

लिंक – FACE RD APP

‘पीएमकिसान गोल’ या नावाचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांचे मोबाइलमध्ये जुने ॲप असेल त्यांनी ते काढून पुन्हा पीएम किसान 2.0 हे ॲप्लीकेशन टाकावे. –

त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यापैकी एक पर्याय निवडावा.

समोर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये लाभार्थ्यांनी लॉगइन करावे. या ॲपच्या वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पीएम किसान आयडी, रजिस्ट्रेशन आयडी किंवा आधारक्रमांक आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्यांचे ई – केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असेल त्यांना तसा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्यांची ई – केवायसी प्रलंबित आहे.

नंतर समोर दिसणाऱ्या ई – केवायसी या लिंकवर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी पीन प्रविष्ठ करावा.

तद्नंतर समोर दिसणाऱ्या स्कॅन फेस या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर फेस आरडी ॲपची लिंक येईल ते ॲप घ्यावे. त्यानंतर मोबाइल मध्ये कॅपच्युरिंग फेस सुरू होईल, त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून प्रोसिड या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर मोबाईलसमोर धरून चेहन्यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करावे.

तद्नंतर इमेज कॅपचर सक्सेसफुली प्रोसेसिंग असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर सक्सेसफुल ई – केवायसी असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्याचे ई – केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

इतर लाभार्थीची ई – केवायसी करावयाची असल्यास डॅशबोर्ड वरील ई – केवायसी फार अदर बेनिफिसीअररी (Beneficiary) या बटनावर क्लिक करावे व पुनश्च वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी.

जर हे शक्य नसेल तर नेहमी प्रमाणे CSC मार्फत प्रक्रिया पूर्ण करावी. 14 वा पीएम किसान सन्मान हप्ता जमा होणे करीता आपले बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक आहे.

त्या शिवाय केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा 4,000 हप्ता बँकेत जमा होणार नाही. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई – केवायसी व आधार बँक लिंक केल्याची खात्री आपले बँकेत करणे आवश्यक आहे.

दोन्ही हप्ते कधी होणार जमा..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर होणार असून महाराष्ट्रातील नमो महासन्मान निधीचे 2000 रुपये याच हप्त्याबाबरोबर सोडण्यात येणार आहे.

सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही,  मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे त्यात थोडा बदल झाला आहे.