Take a fresh look at your lifestyle.

Varas Nond : आता तलाठ्याशिवाय घरबसल्या करा वारस नोंद, 15 दिवसांत होणार 7/12 नावावर ; पहा PDF फॉर्म, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

आजकाल दिवसेंदिवस वाढत जाणारे डिजिटायझेशन लक्षात घेता.. राज्यातील लोकांना मदत करण्यासाठी, बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही..

महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन माध्यमातून वारस नोंदीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याचा वापर करून कोणीही व्यक्ती घरबसल्या आता आपली वारस नोंद करू शकणार आहे, कारण आजपासून काही काळापूर्वी लोकांना वारस नोंद करण्यासाठी तलाठी, महसूल विभाग किंवा लेखपालच्या कार्यालयात जावे लागत होते. परंतु आता ऑनलाईन झाल्याने तुम्ही घरबसल्या वारस नोंद कशी करू शकता ते आपण पाहणार आहोत.

मृत्युनंतर माणसाला एकच काम करता येते, ते म्हणजे त्याच्या वारसांना वारसा हक्क प्राप्ती करून देणे. ज्या क्षणी माणसाचा मृत्यु होतो त्या क्षणाला वारसांहक्काचे जे कायदे अस्तित्वात असतील ते त्याच्या वारसांना लागू होतात. परंतु त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो.

पहिला हा अर्ज हा तलाठी कार्यालयात करावा लागायचा परंतु आता राज्यसरकारने ऑनलाईन केल्यानंतर आता तुम्ही राज्यशासनाच्या ‘ई -हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. 18 व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होत आहे.

या ई – हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ते खालीलप्रमाणे..

सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, कमी करणे..
नावाची दुरुस्ती
वारस नोंदी करणे
ई – करार करणे
अशा सेवांसाठी अर्ज करता येतो.

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज..

1) सर्वप्रथम तुम्हाला महसूल विभागाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या व्हेबसाईटवर जावं लागेल

त्या वेबसाईटच्या डाव्या साईटला (महत्वाची सूचना : ७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली – https://pdeigr.maharashtra.gov.in या व्हेबसाईटवर क्लिक करा

2) Public Data Entry या पेजवर रिडायरेक्ट केल्यानंतर सर्वात शेवटी ‘Proceed to login’वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा.

3) त्यानंतर मोबाईल, पॅन नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’ मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Details मध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा.

4) त्यानंतर पेजखाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर ‘Back’ बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.

5) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ‘ ७/१२ mutations’वर क्लिक करा.

वारस नोंद ऑनलाईन कशी करावी पहा : Varas Nond Online » Farmer Scheme

6) ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असल्यास ‘User is Bank’वर क्लिक करा. एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर ‘Process’वर क्लिक करा, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’चे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर ‘तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.

7) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.

8) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ‘समाविष्ट करा’वर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाहीपैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा’वर क्लिक करा.

9) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्मतारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.

10) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी ‘साठवा’ (सेव्ह) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस’वर क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व ‘साठवा’वर क्लिक करा.

वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज (PDF)

इथे क्लिक करा

11) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागतील.

शपथपत्र अन्‌ स्वयंघोषणापत्र जरुरीचे..

शपथपत्र अन् स्वयंघोषणापत्र जरूरीचे एका कागदावर शपथपत्र लिहून ते अपलोड करावे. त्यात मृत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे, पत्ते नमूद करावे. कागदपत्रे जोडल्यानंतर ‘फाइल’ अपलोड झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर एक स्वयंघोषणापत्र दिसेल. या पत्राखाली ‘सहमत’ या पर्यायावर क्लिक करा.

वारस नोंदी करीता करावयाचा अर्जाचा सर्वसाधारण नमूना (PDF)

इथे क्लिक करा

त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. तेथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे जातो. 18 व्या दिवशी सातबारावर वारसांची नावे लागतील..