भारतातील अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तापमान हळूहळू वाढत आहे. उन्हाळा सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मनात सिंचनाबाबत चिंता वाढू लागली आहे. कारण उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, अनेक भागातील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे सिंचन शक्य होत नाही आणि परिणामी पिके सुकू लागली आहेत..
अनेक वेळा शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी केवळ मान्सूनवर अवलंबून राहावे लागते. पेरणीसाठी शेतकरीही पावसाची वाट पाहत आहेत.त्यामुळे त्यांना पिकांचे फारसे उत्पादन मिळत नाही..
यामुळेच आता राज्यात ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’- 2024 राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75% ते 80% अनुदानावर ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली प्रदान करत आहे. जेणेकरून या तंत्रज्ञानाच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार नाही, नेमकी काय आहे ही योजना ? कसा मिळणार लाभ ? अर्ज कुठे व कसा कराल ? याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत..
शेतकऱ्यांच्या शेतात विहीर, कूपनलिका, वीज, डिझेल, सोलर पंप असे जलस्रोत बसवले तरच सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचा लाभ दिला जाईल..
हेक्टरी नेमकं अनुदान कस मिळणार पहा.
हेक्टरी किती मिळेल अनुदान ते पहा :-
ठिबक सिंचन क्षेत्र
ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6
खर्च मर्यादा :- 1,27,501 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 1,2001 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 95,626 रुपये
2) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5
खर्च मर्यादा :- 97,245 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 77,796 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 72,934 रुपये
3) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 5X5
खर्च मर्यादा :- 39,378 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 31,502 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 29,533 रुपये
तुषार सिंचन क्षेत्र..
1) बाब : तुषार सिंचन (1 हेक्टर साठी)
खर्च मर्यादा (75mm) :- 24,194 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 19,355
अनुदान :- 75 % नुसार – 18,145
अर्ज प्रक्रिया :-
कोणताही इच्छुक शेतकरी ज्याला सरकारी योजनेंतर्गत आपल्या शेतात ठिबक / तुषार स्प्रिंकलर यंत्रणा बसवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या MAHA-DBT पोर्टलवरवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला सध्या अर्ज करावा लागेल त्यासाठी लगेच कागदपत्रे तर लागत नाही. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळते..
1) सर्व प्रथम महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.
2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये ‘अर्ज करा’ यावर क्लिक करा.
3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘सिंचन साधने व सुविधा’ हा ऑप्शन दिसेल. त्याच्यासमोरच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक घटक (सूक्ष्म सिंचन घटक) समोरील बाबी निवड वर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला ‘सिंचन स्रोत’ हा ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचं शेतावरील ‘सिंचन स्रोत’ / ‘ऊर्जा स्रोत’ / तसेच तुमच्याकडे कोणतं सिंचन उपकरण आहे, त्यावर सिलेक्ट करा.यानंतर खाली ‘जोडा’ या शब्दावर क्लिक करा. तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या जतन होईल..
5) आता तुम्हाला तुमचं स्रोत ऍड झालेलं दिसेल. आता तुम्ही मुख्यपृष्ठ वर या. आणि पुन्हा ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक करा. आणि पुन्हा ‘सिंचन साधने व सुविधा’ वरील बाबी निवडा वर क्लिक करा.
6) आता तुमच्यासमोर मेन अर्ज खुलेल जसे की, गाव / तालुका / गट क्रमांक / मुख्य घटक / घटक निवडा / परिणाम / काल्पर व्यास या सर्व बाबी काळजीपूर्वक भरा.
7) यानंतर खाली तुमचं क्षेत्र हंगाम / (हेक्टर आणि आर) / पीके / ही माहिती भरा.
8) यानंतर तुमचा अर्ज ‘Successful‘ होईल.
10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.
11) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…
ठिबक आणि स्प्रिंकलरवरील अनुदानाच्या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकरी त्यांच्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात. याशिवाय शेतकरी CSC सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता..