फक्त 3 हजारांचा EMI 1 वर्ष भरा अन् 25 वर्षांपर्यंत वीजबिलापासून सुटका मिळवा ! पाहिजे तेवढा चालवा एसी, हिटर, गिझर..
महाराष्ट्र हे देशातील उष्ण आणि कोरडे राज्य आहे. राज्यात फारच कमी पाऊस पडतो आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक त्यांच्या घरात एसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा स्थितीत त्यांना महिनाअखेरीस मोठ्या वीजबिलभरणाचा सामना करावा लागतो.
यामुळेच आज महाराष्ट्रातील लोकांनी आपले वीज बिल कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये सोलर सिस्टीम बसवण्यास सुरुवात केली आहे. रुफटॉप सोलरमध्ये 1,852 मेगावॅटसह महाराष्ट्र गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जा हा सर्वोत्तम पर्याय बनला आहे.
म्हणून या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, किती अनुदान मिळतं ? सोलरचा फायदा तुम्ही कसा घ्याल ? लोन प्रोसेस काय आहे ? त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..
किती मिळतंय अनुदान ? किती होईल खर्च, समजून घ्या..
जर तुम्ही तुमच्या घरातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी सोलर सिस्टीम लावली तर सरकार तुम्हाला विहित नियमांनुसार सोलर सबसिडी देते. केंद्र सरकारकडून तुम्हाला जे अनुदान मिळते त्यावर शासन खालीलप्रमाणे अनुदान देते.
आधी तुमची गरज शोधा, तुम्हाला 1,2,3 किलोवॅट सोलर पॅनल बसवावा लागणार आहे.
या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसविण्यासाठी नागरिकांना 1 किलोवॅट सौर पॅनेल बसविण्यासाठी 10 चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे. नागरिकांना 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 40% सबसिडी दिली जाते, तर 3 KW ते 10 KW सोलर पॅनल बसवण्यासाठी 20% सबसिडी दिली जाते.
1 KW सोलर पॅनल साठी खर्च :- 46,820 रुपये
2 KW प्रति सोलर पॅनल साठी खर्च :- 42470 रुपये
3 KW प्रति सोलर पॅनल साठी खर्च :- 41,380 रुपये
3 ते 10 KW प्रति सोलर पॅनल साठी खर्च :- 40,290 रुपये
10 ते 100 KW प्रति सोलर पॅनल साठी खर्च :- 37,020 रुपये
म्हणजेच तीन किलोवॉट (KW) क्षमतेची यंत्रणा बसवण्यासाठी 1,24,140 रुपये खर्च येतो. त्यामध्ये 40% अनुदानाप्रमाणे 49,656 रुपयांचे केंद्र सरकारचे अनुदान मिळेल व ग्राहकाला प्रत्यक्षात 74,484 रुपयांचा खर्च करावा लागेल, एकदाच तुम्ही एवढा खर्च केला तर 25 वर्षांपर्यंत वीजबिलातून सुटका मिळवू शकता.. यामध्ये तुम्ही लाईट्स, रेफ्रिजरेटर, एसी, हिटर, गिझर, मोटार, 24 तास चालवू शकता..
तुम्ही सोलर कर्जही (Solar Loan) मिळवू शकता..
तुम्हाला तुमच्या घरात सौर यंत्रणा बसवण्यासाठी सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असला तरीही तुम्हाला सुरुवातीचा खर्च उचलावा लागेल. पण, जर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील आणि हा खर्च टाळायचा असेल, तर तुम्ही सोलर लोन सुविधेचाही सहज आनंद घेऊ शकता..
Loom Solar च्या माध्यमातून आज तुम्हाला ही सुविधा सहज मिळू शकते. या विषयावरील अधिक माहितीसाठी तुम्ही https://loan.loomsolar.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.आजच्या काळात तुम्हाला महाराष्ट्रातील महाराष्ट्र सहकारी बँकेकडून सौर कर्जाची सुविधा सहज उपलब्ध करून दिली जाते.
तुम्ही 3 ते 5 किलोवॅटच्या सोलर सिस्टीमसाठी 3 ते 7 हजार रुपयांच्या मासिक EMI वर सहजपणे या सुविधेचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही असे केले तर तुम्ही दरमहा केवळ 3 हजार रुपयांचा EMI येईल. यामुळे दरमहा 5 ते 6 हजार रुपयांचे वीज बिल सहज वाचू शकते..
सोलर रुफटॉप योजनेसाठी कसा कराल अर्ज ?
सर्वात आधी रूफटॉप कॅल्क्युलेटर साठी येथे क्लिक करा.
पोर्टलवर पोहोचल्यानंतर, तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये स्टेट, कॅटेगरी, तुमचं महिन्याचं अव्हरेज बिल, एकूण उपलब्ध रूफ टॉप क्षेत्र चौ. मीटर / स्के. फीट, तुमची गुंतवणूक रक्कम, कपॅसिटी KW, त्याखाली तुमचा सध्याचा वीज भार ई. माहिती भरा.
तुमची सरासरी वीज किंमत किती आहे ? सौर कॅल्क्युलेटर पहा.
आता तुमच्या गरजेनुसार वर नमूद केलेल्या मुद्यांची माहिती द्या. आणि Calculate वर क्लिक करा.
आता अर्ज कसा करायचा ?
या नंतर तुम्ही होम पेजवर Apply For Rooftop Solar पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर आपल्या राज्याच्या वेबसाइटच्या css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा.
अर्ज तुमच्या समोर उघडेल.
फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
सौर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप : तुम्ही हा फॉर्म CSC, जनसेवा केंद्रावरही भरू शकता..