Ahmednagar अंगणवाडी भर्ती 2023 : मदतनीस पदांच्या 35 जागांसाठी भरती, शिक्षण फक्त 8 वी पास, पहा पगार अन् अर्ज प्रोसेस..
महाराष्ट्रात ताज्या सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या महिला उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. महिला बाल विकास मंडळातर्फे महाराष्ट्र अहमदनगर अंगणवाडी भरती 2023, महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार तर्फे पर्यवेक्षक, शिक्षक / कार्यकर्ता, मदतनीस पदांच्या रिक्त जागांसाठी WCD महाराष्ट्र भरती 2023 प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.
ही सर्व सरकारी नोकरी शोधणार्यांसाठी चांगली संधी आहे, जे अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक आहे.
पदे :-
अंगणवाडी मदतनीस / Anganwadi Helper – 35 जागा
शिक्षण :-
अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper) :- उमेदवार 8 वी उत्तीर्ण असावा
नोकरी ठिकाण :-
श्रीगोंदा तालुका, अहमदनगर (महाराष्ट्र)
पगार :-
वेतनमान रु. 8,000 – 15,000 /- प्रति महिना
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – 413701.
महत्वाची माहिती..
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.ahmednagar.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
श्रीगोंद्यातील कोणत्या गावांत जागा, कागदपत्रे, पात्रता पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा