आता 1985 ते 2024 पर्यंतचे कोणतेही जुने दस्त शोधा तेही फक्त 2 मिनिटांत..! शासनाकडून नवी प्रणाली 2.1 सुरू..
जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी – विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई – सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई – सर्च 2.1’ ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे ‘ई – सर्च’मध्ये दस्त शोधणे आता अधिक गतिमान झाले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. त्याचाच एक भाग म्हणून खरेदी – विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तर जुने दस्त ऑनलाईन फक्त 2 मिनिटांत कसे पाहायचे ? त्याबाबदल ऑनलाईन प्रोसेस खाली दिली आहे.
एकाच जागेची किंवा सदनिकाची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये आर्थिक फसवणूक होते. एक सदनिका अनेक बँकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात.
या पार्श्वभूमीवर जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई – सर्च’ प्रणाली उपयुक्त ठरते. मागील आठ वर्षांत ‘ई – सच’ प्रणालीमध्ये बदल करण्यात आले नव्हते. आता मात्र तंत्रज्ञान बदलत आहे. तसेच ‘ई – सर्च’मध्ये दस्त शोधण्यास वेळ तर लागताच होता परंतु डाउनलोड करण्यासही अडथळा निर्माण होत होता. अशा तक्रारी आल्याने नोंदणी विभागाने ई – सर्च प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
नोंदणी व मुद्रांक विभागाने ई – सर्च या प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई सर्च 2.1’ ही प्रणाली आणली आहे. यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक गतीने जुने दस्त शोधता येणार आहेत. नागरिकांच्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया feedbackigrmaharashtra@gmail.com या ई – मेलवर कळवाव्यात, असे उपमहानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी सांगितले..
‘ई – सर्च 2.1’ मध्ये हे दस्त उपलब्ध सद्य:स्थितीत ‘ई-सर्च.1’ मध्ये 1985 ते 2002 पर्यंत आणि 2012 ते 2023 पर्यंतचे दस्त उपलब्ध आहेत. सध्या 2002 ते 2012 या दरम्यानचे दस्त उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, दोन महिन्यांत हे दस्त ‘ई – सर्च 2.1’ मध्ये उपलब्ध होतील.
ऑनलाईन फक्त 2 मिनिटांत असे शोधा दस्त ?
सर्वप्रथम, www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सुविधे मध्ये 3 रकाने दिसतील, त्यातील तिसऱ्या रकान्यात तुम्हाला ई – शोध हा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅब करून ‘ई – सर्च 2.1’ या ऑप्शनवर क्लिक करा..
या नंतर एक फॉर्म खुलेल, यामध्ये सुरुवातीस वर्ष, जिल्हा, तालुका, गाव दस्ताचा प्रकार, सर्व्हे नंबर, सिटी सर्व्हे नंबर अथवा दस्त नंबर ही माहिती भरल्यानंतर ‘ई – सर्च’ मध्ये मिळकतीबाबत नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांची लगेच यादी मिळणार आहे. .
ही तुम्ही PDF फाईल म्हणून सेव्ह करू शकता..