अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात झालेल्या 45 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलाच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरालगत असलेल्या 24 जानेवारीला दोघांचे मृतदेह सापडले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे शीर गायब करण्यात आले होते. तर मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याच्या खुणा होत्या. जवळच काही संसारोपयोगी साहित्यही आढळले होते.
गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यातच दोघांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
सात दिवसांपूर्वी महिला आणि मुलगा असे दोन अज्ञात मृतदेह आढळले होते. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आणखी दोन आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.