शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!

0

मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे.

सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघणार आहे. अखिल भारतीय किसान सभेनं पुकारलेल्या या मोर्चात राज्यभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून पायी निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत कोणत्याही क्षणी धडकण्याच्या मार्गावर आहे.

सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या असून मुक्काम करत करत हे सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानात येत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. किसान मोर्चावर ड्रोनची नजर असणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 100 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 500 हून अधिक पोलीस शिपाई रस्त्यावर असणार आहेत.

शुक्रवारपासूनच पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. येणारी वाहणं तपासून ती शहरात सोडली जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शेती news, यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान या विषयक update मिळवण्यासाठी आमचा 8055030606 हा न तुमच्या व्हाट्सएप ग्रुप ला add करा

Leave A Reply

Your email address will not be published.