कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे संदीप सुरेश मागाडे या तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना इचलकंरजीतील कबनूर येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात मुख्य संशयित आरोपींमध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे दोघेही मुख्य संशयित आरोपी असल्याचे म्हटलं जात आहे.
रात्री कामावरून परतल्यानंतर तो कबनूर चौकात डेक्कन रोडवर थांबला असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
संदीप हा जखमी अवस्थेतच जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. यानंतर आझादनगर परिसरात पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठले. यावेळी तलवारीसह धारदार शस्त्राने त्याच्यावर तीक्ष्ण वार करण्यात आले. यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संदीपच्या डोक्यात, खांद्यावर सुमारे सातहून अधिक तीक्ष्ण वार करण्यात आले होते. तसेच हल्ला रोखताना त्याचे हातावरही वर्मी घाव बसल्याचे तपासात निष्पन्न झाले. संदीप याच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी धाव घेतली.
हल्लेखोरांनी थरारकरित्या पाठलाग करून केलेल्या या घटनेमुळे कबनुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
शेती news, यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान या विषयक update मिळवण्यासाठी आमचा 8055030606 हा न तुमच्या व्हाट्सएप ग्रुप ला add करा
- जालना – नांदेड समृद्धी एक्सप्रेस-वे : दिवाळीनंतर होणार प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात, ‘या’ 87 गावांतून जाणार मार्ग, पहा संपूर्ण रोडमॅप..
- Small Business Loan : लघु कर्ज मिळवणं होणार सोपं ?
- महिलांना न्यू स्टार्टअपसाठी मिळतंय 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य, 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..
- Land Record: दिवसभरात 2 लाख कागदपत्रे डाऊनलोड, फक्त 2 मिनिटांत डाउनलोड करा 7/12 – 8-A, Property Card, eFerfar उतारे..
- फक्त 50 हजारांत सुरु करा ‘मशरूम शेती’ ; 3 चं महिन्यात व्हाल लखपती, सरकारही देतंय 40% अनुदान !