शेती शिवार टीम : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत . या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे.
या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबईमध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
शेती news, यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान या विषयक update मिळवण्यासाठी आमचा 8055030606 हा न. तुमच्या व्हाट्सएप ग्रुप ला add करा
- PM KISAN : पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होणार? कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची संसदेत स्पष्टोक्ती
- RBI चं शेतकर्यांना मोठं गिफ्ट: शेतकऱ्यांना मिळणार आता दोन लाखापर्यंत विना तारण कर्ज
- जालना – नांदेड समृद्धी एक्सप्रेस-वे : दिवाळीनंतर होणार प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात, ‘या’ 87 गावांतून जाणार मार्ग, पहा संपूर्ण रोडमॅप..
- Small Business Loan : लघु कर्ज मिळवणं होणार सोपं ?
- महिलांना न्यू स्टार्टअपसाठी मिळतंय 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य, 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..