Take a fresh look at your lifestyle.

शेततळे खोदा अन् मिळवा 75,000 रु. अनुदान; नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीडमध्ये होणार 3,270 शेततळे, असा करा ऑनलाईन अर्ज..

0

औरंगाबाद विभागीय कृषी 8 सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 हजार 740 वैयक्तिक शेततळी खोदण्यात येणार आहेत. अहमदनगरसाठी 930 तर पुणे जिल्ह्यासाठी 600 शेततळ्यांचे उद्धिष्ट दिलं गेलं आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम दुप्पट करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यास 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव म्हणाले की, पावसाचा खंड पडल्यास कोरडवाहू शेतीत पिके येत नाहीत . मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना शासनाने आणली आहे.

मुबलक पाऊस. पडतो, तेव्हा नदी, नाल्यातून वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवून त्याचा शेतीसाठी वर्षभर वापर करता येतो. ही बाब लक्षात घेऊन वैयक्तिक शेततळे योजना आणली आहे. आठ प्रकारची शेततळी खोदता येतात.

आकारमानानुसार खोदकामासाठी लागणाऱ्या किमतीच्या 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

औरंगाबाद विभागात 1 हजार 740 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट..

कृषी विभागाच्या औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांसाठी शासनाने 1 हजार 740 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वैयक्तिक शेततळे योजनेंतर्गत असलेल्या या शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. असे आहे तीन जिल्ह्यांचे उद्दिष्ट

औरंगाबाद :- 640
जालना :- 470
बीड :- 630
पुणे :- 600
अहमदनगर :- 930

जे शेतकरी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून सर्व स्टेप बे स्टेप प्रोसेस पाहू शकता..

   शेततळे अनुदान योजना अर्ज प्रोसेस

Leave A Reply

Your email address will not be published.