शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : कोरफडला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा वापर. कोरफड ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शॅम्पू या सर्वांना ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही कोरफडची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो. कोरफड लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करून 5 वर्षांपर्यंत नफा मिळवू शकता…
एकदा रोप लावल्यानंतर त्या रोपातून बाहेर येणारं बेबी प्लांट तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोपांची संख्या वाढवू शकता. कृषी तज्ञांच्या मते, कोरफडचं रोपं 3 ते 4 महिन्यांत बेबी प्लांट देऊ शकतं.
कोरफडीची जर तुम्ही एका एकरात लागवड केल्यास दरवर्षी तुम्हाला सुमारे 20 हजार किलो कोरफडीचं उत्पादन होतं. कोरफडीची ताजी पाने विकल्यास त्याची किंमत 5 ते 6 रुपये किलो आहे.
कॉस्मेटिक प्रॉडक्ट असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफडीची मागणी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोरफडीची पाने आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना विकू शकता…
कोरफडीच्या लागवडीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतात जास्त ओलावा नसावा, तसेच शेतात पाणी साचू नये. कोरफडीसाठी वालुकामय (रेतीली) माती सर्वात योग्य मानली जाते. कोरफडीच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यामध्ये नीळ (इंडिगो) सर्वात सामान्य आहे जी सामान्यतः घरांच्या आजूबाजूला आढळते. पण त्याची कोरफडीची बार्बाडेन्सिस प्रजाती खूप लोकप्रिय आहे.
शेतकरी बार्बाडेन्सिस प्रजातीची लागवड करण्यास प्राधान्य देतात, कारण तिची पाने मोठी असतात आणि त्यातून जास्त जेल निघतं. कोरफड लागवडीत फेब्रुवारी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पेरणी करता येते. लागवड करताना दोन रोपांमध्ये 2 फूट अंतर असावं. रोपाची लागवड केल्यानंतर, शेतकरी वर्षातून दोनदा त्याची पाने काढू शकतात आणि नफा मिळवू शकतात.
शेतकरी एक एकर शेतात 12 हजार कोरफडीची रोपे लावू शकतात. लागवडीसाठी लावलेल्या रोपाची किंमत 3 ते 5 रुपये आहे.
कोरफडीच्या एका रोपापासून 3.5 किलोपर्यंत पाने मिळतात आणि एका पानाची किंमत 5 ते 6 रुपयांपर्यंत असते. तसे पाहता, एक रोप आणि पाने सरासरी 18 रुपयांपर्यंत विकली जातात. अशा परिस्थितीत 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून शेतकरी 2.25 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकतो. म्हणजेच कोरफडीच्या लागवडीतून एकूण 5 पट नफा मिळू शकतो.