Take a fresh look at your lifestyle.

EPFO खातं असेल तर 7 लाखांचा मिळेल फायदा, थेट बँकेत होणार पैसे जमा !

0

शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) खातं नोकरदारांसाठी जीवनरेखा म्हणून काम करतंय. परंतु तुम्हाला माहिती आहे का की EPFO ​​आपल्या खातेधारकांना असे अनेक फायदे देतं त्याबद्दल सर्वांनाच माहिती नसतं.

EDLI योजनेअंतर्गत, EPFO ​​खातेधारकांना 7 लाखांचा लाभ मिळतो. यापूर्वी ही रक्कम 6 लाख रुपये होती. पण 7 लाख रुपयांचा हा फायदा फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी ई-नॉमिनेशन (E-nomination) केलं आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला ई-नॉमिनेशन करता आलं नसेल तर ते काम तुम्हाला लवकरात – लवकर पूर्ण करावं लागेल.

साधारतः EPFO ​​त्याच्या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI scheme) अंतर्गत अनेक फायदे आहेत ज्याचा लाभ घेता येतो. यामध्ये ग्राहकांना 7 लाख रुपयांच्या इतर लाभांसह हमी पेन्शन आणि विमा मिळतो.

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी सरकारी संस्था आहे. प्रत्येक PF सब्सक्राइबरने नॉमिनी निवडले पाहिजे जेणेकरून त्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला त्याच्या खात्याशी जोडलेले फायदे मिळू शकतील.

EPFO ग्राहकाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंतच्या जीवन विम्याचा लाभ देते. अशा स्थितीत नॉमिनेशन डिटेल्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI scheme) चा लाभ त्वरित उपलब्ध आहे.

जर ग्राहकांनी ऑनलाइन नॉमिनेशन केले, तर त्यांना नंतर एनओसी (NOC) मिळविण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे EDLI योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ई-नॉमिनेशन करा जेणेकरून नंतर होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.