Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : राहुल पाचर्णे यांचा उमेदवारी अर्ज बाद ; आ. अशोक पवारांचा जिल्हा बँकेवर जाण्याचा मार्ग मोकळा !

0

शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या ‘अ’ वर्ग प्रतिनिधी वर्गातून शिरुर – हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांचा उमेदवारी अर्ज सहकारी संस्थेवर कामकाज केले म्हणून अनुभवाचा दाखला न जोडल्याने घेतलेल्या हरकतीत बाद झाला आहे. 

अर्ज बाद झाल्याने राहुल पाचर्णे हे न्यायालयात धाव घेणार की काय ? याबाबत शिरुरच्या ‘अ ‘ लढतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

जिल्हा बॅकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ६) रोजी राहुल पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शिरुर तालुक्यातील’ अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा शिरुर-हवेलीत आहे.

परंतु, मंगळवारी (ता. 7) रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीत राहुल पाचर्णे यांच्या अर्जासोबत सहकारी संस्थेवर कामकाज केल्याचा अनुभव असल्याचा दाखला जोडला गेला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी त्यांचा अर्ज हरकतीवरून बाद ठरविला आहे.

राहुल पाचर्णे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्याने ते उमेदवारी अर्ज कायम राहण्यासाठी न्यायालयात धाव घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु राहुल पाचर्णे यांचा अर्ज बाद ठरविल्याने राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.

राहुल पाचर्णे यांचा अर्ज बाद झाल्याने विद्यमान आमदार अशोक पवार जिल्हा बॅकेत जाण्याचा मार्ग तुर्तास मोकळा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.