Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview Questions : जगातील शेवटचा रस्ता कोठे आहे ? आणि त्या रस्त्याचं नाव काय ?

0

शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : IAS किंवा IPS परीक्षा आणि इंटरव्यू देणे हे खूप अवघड असते कारण विचारले जाणारे प्रश्न सोपे तर असतात,परंतु जेव्हा ते वेगळ्या प्रकारे विचारले जातात, तेव्हा काही कँडिडेट्स बरेचदा विचारात पडतात. तसेच अनेक कँडिडेट्स या परीक्षेत बसतात पण काही कँडिडेट्सच या परीक्षेत पोस्ट काढतात.

असं मानलं जातं की, पोस्ट काढणं जरा सोपं आहे, परंतु प्रत्येकजण इंटरव्युव्ह पास करण्यास सक्षम नसतो. कारण इथे त्याच्या विचारशक्तीची कसोटी घेतली जाते.अशा परिस्थितीत,आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न आणि उत्तर सांगत आहोत,जे यापूर्वी IAS किंवा IPS परीक्षा आणि इंटरव्युव्ह विचारले गेले होते.

प्रश्‍न :- तुमच्या समोर लटकणारी गोलाकार वस्तू कोणती ?
उत्तर :- घड्याळ.

प्रश्न :- बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवसांची नावं न घेता सलग तीन दिवसांची नावे सांगा ?
उत्तर :- काल, आज आणि उद्या. (Yesterday, Today and Tomorrow)

प्रश्न :- अशी कोणती गोष्ट आहे, जी घेणारा घालू शकत नाही आणि घालणारा स्वतःसाठी कधीही खरेदी करू शकत नाही ?
उत्तर :- कफन (शवपेटी)

प्रश्न :-  अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही अन्न खाण्यासाठी खरेदी तर करता पण खाऊ शकत नाही ?
उत्तर :- प्लेट.

प्रश्‍न : अशी कोणती गोष्ट आहे की ती अर्धवट गेली तर त्रास होतो ,पण ती पूर्णपणे गेली की मजा येते?
उत्तर :- हातातली बांगडी .

प्रश्न : तुमची आई सर्व काही घेऊ शकते ,पण तुम्ही तुमच्याचं वडिलांकडून काय घेऊन जाऊ शकत नाही?
उत्तर :- तुमच्या वडिलांचे नाव.

प्रश्न :- असं काय आहे, जे पुरुषाचं लांब अन् स्रियांच्या गोल असतं ?
उत्तर :- टिळा-गंध.

प्रश्न : बंगालचा उपसागर कोणत्या अवस्थेत आहे ?
उत्तर : द्रव अवस्थेत.

प्रश्न : आदर्श आणि अनुपम या जुळ्या मुलांचा जन्म मे मध्ये झाला, पण त्यांची जन्मतारीख जून आहे, हे कसे शक्य आहे ?
उत्तर :- कारण मे हे ठिकाणाचं नाव आहे.

प्रश्न : जगातील शेवटचा रस्ता कुठे आहे आणि त्याचे नाव काय आहे?
उत्तर :- जगातील शेवटचा रस्ता “नॉर्वेमध्ये आहे आणि त्याचं नावं  E69 असं आहे.

प्रश्न : कोणत्या प्राण्याचं शरीर बुलेट प्रूफ आहे ?
उत्तर : हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतो. त्याचे नाव आर्माडिलो आहे. कोणत्याही संकटात, ते त्याचे शरीर संकुचित करते आणि ते खूप लहान करतं . हा जगातील एकमेव प्राणी आहे ज्याची बाह्य त्वचा अगदी बुलेट प्रूफ जॅकेटसारखी आहे.

प्रश्न :  असं कोणतं शहर आहे त्याला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं ?
उत्तर :- अलाहाबाद
1858 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने शहरातील ब्रिटिश राजेशाहीकडे राष्ट्राचा कारभार सोपवल्यामुळे अलाहाबाद शहराला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं. त्यावेळी अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांची राजधानी होती.

प्रश्न :-  महिलांचा सर्वात संवेदनशील भाग कोणता ?
उत्तर :- योनीमार्गातील क्लिटॉरिस (Clitoris) हा महिलांचा सर्वात संवेदनशील भाग जातो.

प्रश्न :- CDS चा फुल फॉर्म काय आहे ? त्या पदा बद्दल तुम्ही काय सांगाल ?

उत्तर :- “CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defence Staff of the Indian Armed Forces)

हा लष्करी अधिकारी लष्कराच्या “आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स” च्या तीन भागांचा प्रमुख असतो. जो विशिष्ट परिस्थितीत तिन्ही सैन्याच्या ऑपरेशन्समध्ये समन्वय आणि नियंत्रण ठेवतो. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी ते थेट संपर्कात असतात.कोणत्याही देशासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पद मानलं जातं ?

प्रश्न :- सपाट पाय (flatfoot) असलेल्या मुलांना भारतीय सैन्यात भरती का केलं जात नाही ?
उत्तर :- मेडिकल रिपोर्टनुसार, सपाट पाय असलेला मुलगा सैन्यात दैनंदिन कामे करण्‍यासाठी फिट बसत नाही. सपाट पाय असलेल्या मुलांमध्ये गुडघे, कंबर, पाय आणि तळव्यांना सूज येणे यांसारख्या तक्रारी असतात. सपाट पाय असलेल्या मुलांनी अति रनिंग केली तर त्यांच्या मणक्याचे नुकसान होऊ शकतं.

सैन्याची कठोर शारीरिक दिनचर्या असते ज्यामध्ये भरपूर धावणे, चढणे, उडी मारणे, कठीण प्रदेशात असमान पृष्ठभागावर धावावं लागतं. म्हणूनच सपाट पाय असलेल्या मुलांना सैन्यात घेतलं जात नाही.

प्रश्न :- असा कोणता शब्द आहे, ज्यामध्ये फळ, फुल, मिठाई हे तिन्ही शब्द येतात ?
उत्तर : गुलाब जामुन.

प्रश्न :-  स्त्रीचं असं कोणतं रूप आहे जे तिचा पती कधीही पाहू शकत नाही ?
उत्तर : विधवेचे रूप

प्रश्न :- भारतात असं कोणतं राज्य आहे, तिथे एकच व्यक्ती अजूनपर्यंत मुख्यमंत्री आहे ?
उत्तर : तेलंगणा (Telangana State) तेलंगणा हे असं राज्य आहे, ज्याची स्थापना 2 June 2014 झाली असून स्थापनेपासून के.चंद्रशेकर राव (K. Chandrasekar Rao) तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.

प्रश्न :- आत्तापर्यंतचा भारतातील सर्वात महागडा चित्रपट कोणता ठरला ?
उत्तर : सध्या भारतात आणि बॉलीवूडमधील सर्वात महागडा चित्रपट आहे रजनीकांतचा ‘2.0’. या 2.0 चित्रपटाचे बजेट 563 कोटी इतकं प्रचंड होतं. हा शंकर दिग्दर्शित सायन्स फिक्शन चित्रपट आहे. यामध्ये रजनीकांत, एमी जॅक्सन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला 2010 च्या तमिळ चित्रपट एन्थिरन (Robot) चा हा दुसरा भाग आहे.

प्रश्न :- जगातील असा कोणता देश आहे तिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ?
उत्तर : भूटान

प्रश्न :- ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झालं अन् कधी संपलं ?
उत्तर – ताजमहालचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झालं आणि 1653 मध्ये पूर्ण झालं. ही इमारत बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला.

प्रश्न :- असा कोणतं पाळीव प्राणी आहे, ज्या प्राण्याच्या दुधाचं कधीच दही होतं नाही ?
उत्तर – उंट

प्रश्न :- मानवी डोळ्याचे वजन किती असतं ?
उत्तर- मानवी डोळ्याचे वजन फक्त 7.5 ग्रॅम आहे.
अतिरिक्त माहिती :- मानवी डोळ्याचं वजन फक्त 0.25 ounce म्हणजे 7.5 grams असतं. डोळ्याची साइज ही 0.4 cubic inch म्हणजे 6.5 cm3 असते. किती गंमत आहे ना, 75 किलोच्या मानवी शरीरात 7.5 ग्रॅमचा डोळा इतका महत्त्वाचा आहे की, तो नसेल तर संपूर्ण शरीर निरुपयोगी ठरतं.

प्रश्न :- मानवी मेंदूची स्टोरेज कॅपिसिटी किती आहे ?
उत्तर :- मानवी मेंदूची ब्रेन स्टोरेज कॅपिसिटी (Brain storage capacity) ही 10 लाख GB आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.