Take a fresh look at your lifestyle.

Ashok Leyland ने लॉन्च केला ई-कॉमेट स्टार CNG ट्रक ; पहा डिटेल्स

0

शेतीशिवार टीम, 8 फेब्रुवारी 2022 : अशोक लेलँडने Ecomet Star ICV CNG ट्रक रेंज लॉंच केला आहे. हे 16.1T आणि 14.250T GVW चे 2 ऑप्शन आणि 3 CNG सिलेंडर ऑप्शनसह बाजारात लॉंच केला गेला आहे. नवीन रेंजसोबत कंपनी 4 वर्षे किंवा 4 लाख किलोमीटरची वॉरंटीही देत ​​आहे. हा सीएनजी ट्रक ऍडव्हान्स डिजिटल ड्रायव्हर डॅशबोर्डसह येतो.

यासोबतच रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी शक्तिशाली राउंड हेड लॅम्प देण्यात आले आहेत. जबरदस्त मायलेज, हाय ट्रेड टायर्स, कमी मेंटेनन्स ,हे मालकासाठी टर्नअराउंड टाईम (TAT) मध्ये फायद्याची गॅरंटी देते, ज्यामुळे चालवण्याचा खर्च बेस्ट – इन- क्लास होतो.

अशोक लेलँडचे मिडियम आणि हेव्ही कमर्शियलव्हीकल चे हेड संजीव कुमार यांनी या सांगितलं की, “इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेईकल सीएनजी (CNG) सेगमेंटच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन आम्ही आमच्या अत्यंत यशस्वी ई-कॉमेट प्लेटफॉर्म सीएनजी (CNG) ट्रकची पहिली रेंज सुरू केली आहे.

ई-कॉमेट स्टार (E-Comet Star) नावाचे सादर केली आहे. जसजसे गतिशीलतेकडे वाटचाल करत आहोत,तसतसे आमच्या ग्राहकांच्या गरजाही समोर येत आहेत.

संजीव कुमार म्हणाले की, ही सीएनजी (CNG) रेंज सुरक्षित, फ्यूल इफिशिएंट आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप फायद्यांसह त्या गरजा पूर्ण करू शकते. ही नवीन रेंज आमचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल, ज्यामुळे आम्हाला झपाट्याने वाढणाऱ्या CNG स्पेस बाजारपेठेतील हिस्सेदारी सुधारता येईल आणि जागतिक स्तरावर शीर्ष 10 कमर्शियल व्हीकल मॅनुफॅक्चरर उत्पादकांपैकी एक होण्याच्या आमच्या व्हिजनला मदत मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.