अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 : ‘या’ जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या प्रसिद्ध, पहा तुमचं नाव आहे का ? अशी करा PDF फाईल डाउनलोड..
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 च्या लाभार्थी याद्या संदर्भातील महत्त्वाचं अन् दिलासादायक अपडेट हाती आलं आहे. 2022 मध्ये शेतकऱ्यांचा शेतीपिकांचे अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होतं. यासाठी काही प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात आलेलं आहे. परंतु अद्यापही बरेच शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
या मदतीचं वितरण केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाव्यात अशा प्रकारच्या सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणं अपेक्षित होतं. मात्र आपण पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणात वितरण झाल्यानंतरही अद्यापही बऱ्याच जिल्ह्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या नाहीत.
यापूर्वी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, तसेच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, लोहा, कंधार,किनवट तालुक्यांची याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
आणि आता वर्धा जिल्ह्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या काही तालुक्यातील याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. याबाबतचं नोटिफिकेशन वर्धा जिल्हा परिषद संकेतस्थळावर नोटिफिकेशन आलं आहे.
या याद्यांमध्ये सर्कल, गाव, लाभार्थी नाव, बँकेचं नाव, आणि वितरित केलेली रक्कम अशा प्रकारे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
त्याच्यासोबत एक दुसरी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्या माध्यमातून सुद्धा शेती पीक, शेत जमीन नुकसानीबाबत अनुदान वाटपाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. आता हळूहळू याद्या प्रसिद्ध होत असून इतर जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रकाशित करण्यात येईल त्या संदर्भात अपडेट आलं तर आपण पाहणार आहोत..
यादीत आपलं नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
माहे जून ते ऑक्टोंबर,2022 मध्ये झालेल्या शेतजमीन / शेतीपिकाचे नुकसानीच्या यादया व मदतीचा तपशिल