Take a fresh look at your lifestyle.

या नंबर 1 E-Scooter वर तब्बल 25,000 रुपयांचा डिस्काउंट, आजपासून फक्त 4 चं दिवस ऑफर, पहा डिटेल्स..

0

तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या प्रजासत्ताक दिनी, OLA E-Scooter तुमच्यासाठी एक अद्भुत संधी घेऊन आली आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनी तुम्ही ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला OLA च्या काही खास मॉडेल्सवर आणखी उत्तम ऑफर मिळत आहे, ज्यामुळे तुमची बचत 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण यासाठी तुम्हाला लवकरात – लवकर बुकिंग करावे लागेल, कारण या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आहेत.

OLA ई – स्कूटर ऑफर..

प्रजासत्ताक दिनानिमित्त, ओला (OLA) ने सांगितले की, ग्राहकांना OLA S1 Pro खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय खाकी रंगाचा OLA S1 Pro खरेदी केल्यास तुम्हाला 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. Ola ने सांगितले की, Ola ने एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्हाला आणखी 10,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

किती दिवसापर्यंत आहे ऑफर..

OLA ची ही प्रजासत्ताक दिन ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे. ही खास ऑफर 26 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंतच ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

ओला ई – स्कूटरचा वेग आणि रेंज..

OLA च्या अधिकृत वेबसाइटनुसार, ओला 170 किमीची खरी रेंज देते आणि यूजर्स 116 किमीच्या टॉप स्पीडने ट्रॅव्हल करू शकता. ही स्कूटर केवळ 2.9 सेकंदात 0 ते 40 किमीचा वेग पकडते. स्कूटर चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात. यात इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर ड्रायव्हिंग मोड आहेत.

कलर ऑप्शन

OLA ची सर्वाधिक पॉप्युलर Ola S1 Pro 2021 मध्ये लॉन्च झाली असून या स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. पोर्सिलेन व्हाइट, खाकी, निओ मिंट, कोरल ग्लॅम, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, लिक्विड सिल्व्हर, मिलेनिअल पिंक, अँथ्रासाइट ग्रे, मिडनाईट ब्लू आणि मॅट ब्लॅक यासह अनेक कलर ऑप्शन मध्ये हे ऑफर करण्यात आली आहे.

15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी..

अलीकडेच कंपनीने Ola S1 Pro साठी MoveOS 3 अपडेट जारी केला आहे. ही स्कूटर OS हिल-असिस्ट, जलद चार्जिंग आणि अनेक नवीन फिचर्ससह येते. हे फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये तुम्हाला पार्टी मोड आणि अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.