Take a fresh look at your lifestyle.

एकेकाळी 1 लीटर पेट्रोलच्या दरात मिळत होतं 1 तोळं सोनं; पुण्यातल्या अष्टेकर ज्वेलरचं जुनं बिल व्हायरल, पहा फोटो..

0

महागाईच्या विळख्याने जनता इतकी त्रस्त झाली आहे की, त्याबाबत भाष्य केले तरी सर्व सामान्य नागरिक भडकताना दिसत आहेत. सध्या वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. त्यातच वस्तूंच्या किमती कधी आणि किती वाढतील याचा अंदाज देखील बंधने मुश्किल झाले आहे. अशातच समाजातील गरीब वर्गातील लोकांना दोन वेळची भाकरी मिळणेही महाकठीण झाल्याचे चित्र आहे.

अशातच सोशल मीडियावर काही जुन्या बिलांचे फोटोज व्हायरल होत असल्याचे पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. असाच काही दिवसांपूर्वी एका बुलेटचे बिल व्हायरल झाले होते, त्यानंतर सायकलचे बिल, त्यानंतर काही दिवसांनी जुन्या गव्हाच्या दराचे बिलही व्हायरल झाले होते.

आता या यादीत आणखी एका जुन्या बिलाची भर पडली असून आताचा विषय तर भारतीय महिलांच्या तर अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आता जे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते बिल आहे सोन्याच्या दागिन्यांचे..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जुन्या बिलाच्या पावतीनुसार हे बिल आहे 1959 सालचे. सदर छायाचित्रात हे बिल सुमारे 64 वर्षे जुने असल्याचे दिसून येत आहे. त्या काळातील सोन्याचा भाव जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्या काळात एक तोळा सोन्याची किंमत होती केवळ 113 रुपये. आत्ताच्या काळामध्ये तर चॉकलेट घेण्यासाठी सुद्धा एवढे पैसे पुरेसे नसतात अशी परिस्थिती आहे.

आज एक तोळा सोन्याचा भाव 57 हजारांवर पोहचला आहे जो आत्तापर्यंतच्या रेकॉर्ड स्थरावर आहे. व्हायरल छायाचित्रानुसार हे बिल 3 मार्च 1959 चे आहे. सदर बिल वामन निंबाजी अष्टेकर या सराफा दुकानाचे आहे.

बिलावर खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम असे दिसून येत आहे. या बिलात आत्माराम यांनी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केल्याचे दिसून येत आहे. ज्याची एकूण किंमत 109 रुपये लिहिली आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात आता हे बिल खूप व्हायरल होत आहे. हे बिल पाहून खर तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोक म्हणतात की ते अच्छे दिन होते. तर काहींच्या मते त्यावेळचे 113 रुपये आजच्या 50,000 रुपयांच्या बरोबरीचे आहेत. या जुन्या बिलाबाबत लोक भरपूर चर्चा करत आहेत. यावर तुमचे काय मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.