टाटाच्या ‘या’ टेक्नॉलॉजीची देशाला भुरळ ! CNG गाड्यांमध्ये असा लपवला सिलेंडर, मोक्कार बूट स्पेस, 32Km पर्यंत मायलेज..
ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मध्ये यावेळी फार काही नाही पण काही टेक्नॉलॉजी अशी पाहायला मिळाली ज्यावर लोक आकर्षित झाले आहे, असेच दृश्य यावेळी टाटा मोटर्सच्या पॅव्हेलियनमध्ये पाहायला मिळाले, कंपनीने यावेळी अनेक मॉडेल्स सादर केले. पण टाटाच्या CNG कारने सर्वाधिक आकर्षित केले.
आत्तापर्यंत CNG गाड्यांमध्ये एकच मोठा सिलिंडर बघायला मिळत होता, त्यामुळे गाडीच्या बुट – स्पेसमधली जागा पूर्णपणे संपत होती, अशा परिस्थितीत सामान ठेवायला जागाच अपुरी पडत होती. परंतु यावेळी टाटा ब्रँडने हुशारीने हा प्रश्न सोडवला.
कंपनीने एक्स्पोमध्ये पंच सीएनजी आणि अल्ट्रोज सीएनजी मॉडेल सादर केले होते, यावेळी कंपनीने त्यात एक नाही तर 2 छोटे सीएनजी सिलिंडर बसवले होते तर त्यावर वरून ट्रे लावला होता, आता असं झालं की, तुम्हाला पूर्णपणे जागा मिळाली तसेच सिलिंडरही लपवले आहेत. टाटाच्या या टेक्नॉलॉजीचे संपूर्ण देशाला भुरळ लावली.. चला जाणून घेऊया Punch CNG आणि Altroz CNG बद्दल..
टाटा पंच सीएनजी (Tata Punch CNG) :-
पंच सीएनजी या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त मिड साईझ कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून स्वतःसाठी एक वेगळं स्थान निर्माण करू शकते. याला समान 1.2L 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन मिळेल परंतु पॉवर आणि टॉर्कमध्ये किंचित घट होईल. सूत्रानुसार, त्याचे मायलेज सुमारे 30km/kg असण्याची अपेक्षा आहे.
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर ड्युअल एअरबॅग्ज, ब्रेक स्वे कंट्रोल, एबीएस विथ ईबीडी आणि सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स या मॉडेलमध्ये आढळू शकतात. सूत्रानुसार, पंच CNG 30km/kg मायलेज देण्याचा दावा जाणकारांनी दर्शवला आहे.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी (Tata Altroz CNG) :-
Altroz CNG च्या माध्यमातून कंपनी थेट मारुती सुझुकीशी स्पर्धा करेल. यात 1.2L टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल परंतु पॉवर आणि टॉर्कमध्ये थोडीशी घट होईल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. कारच्या डिझाईनपासून ते केबिनपर्यंत कोणताही बदल होणार नाही. ही कार बलेनो सीएनजीशी थेट स्पर्धा करेल, ज्याने यावेळी एक अतिशय किफायतशीर कार म्हणून आपले स्थान निर्माण केलं आहे.