‘या’ 65 हजार शेतकऱ्यांसाठी 68 कोटींचा निधी ! खात्यात हेक्टरी 36,000 रुपये होणार जमा, खाते क्रमांक – आधार लिंक करण्याचे आवाहन..

0

गारपीट, अतिवृष्टी, वादळ अशा आस्मानी संकटांच्या मालिकेत पिचून निघालेल्याा व शासनाच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या बळीराजाची नुकसानभरपाईची प्रतीक्षा आता संपली आहे. 65 हजार शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली 68 कोटींची नुकसानभरपाई येत्या आठवडाभरात टप्प्याटप्प्याने बँक खात्यात जमा होणार आहे.

जिरायतीसाठी हेक्टरी 16 हजार 600, बागायतीकरिता हेक्टरी 27 हजार रुपयांचे अर्थसाह्य तर बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार नुकसान भरपाई मिळणार आहे.

26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत सिंदखेड राजा तालुक्यात गारपीट, अतिवृष्टी, अवेळी पाऊस पडला. सोयाबीन, कापूस व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून गेला अतिवृष्टी होऊनदेखील अनुदान मिळण्यास सरकारकडून मोठा उशीर होत होता. पीकविम्याचा सर्वे करूनही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही. त्यामुळे शासन शेतकऱ्याला मदत करते की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.

मात्र, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सिंदखेड राजा तालुक्यासाठी अतिवृष्टीचे 68 कोटी 29 लाख रुपये दिले आहेत, त्यामुळे तालुक्यातील 64 हजार 563 शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे.

तालुक्यात लागवडीखालील 47 हजार 15 हेक्टर क्षेत्र आहे या शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाइन सरसकट मदत जमा होणार आहे.

अशी होणार मदत..

जिरायती क्षेत्रासाठी 13 हजार 600 रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे. तर बागायती क्षेत्रासाठी 27 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याची मर्यादादेखील तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत आहे.

अनुदानाची रक्कम कपात न करण्याचे आदेश..

शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले की, त्यातील रक्कम कर्जखात्यात जमा करू नये तसेच कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नये, अनुदानाची रक्कम बँकने कपात करू नये, अशी सक्त ताकीद तहसीलदार सचिन जयस्वाल यानी बँकांना दिली आहे.

खातेक्रमांक अपडेट असणे गरजेचे..

मदतीचे पैसे प्राप्त झाले असून तलाठ्याकडून याद्या घेणे सुरू आहे त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे पडावे, यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. रक्कम खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला खाते क्रमांक अपडेट करून आधार लिंकिंग केलेले असावे. ज्यांचे खाते क्रमांक अपडेट असतील त्यांच्या खात्यावर लगेच अनुदानाचे पैसे जमा होतील.

मात्र, ज्यांचे नसेल त्यांनी तत्काळ आपले खाते अपडेट करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी केले आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्यांनी या विभागाचे महसूल सहायक हिरामण बागूल यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसीलदारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.