पुणे – छ. संभाजीनगर एक्सप्रेस वे – पुणे रिंगरोड 12 गावातून एकत्र जाणार ! 31Km अंतरासाठीचा 5,000 कोटींचा खर्च NHAI करणार
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळान (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्ता 12 गावातून एकत्र जाणार आहे. त्यामुळे हे अंतर 31 किलोमीटरच आहे.
या 31 किमीमधील रस्त्यासाठी भूसंपादन आणि विकसनाचे काम एनएचएआयकडून केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागातील रस्ता खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यांतून आणि चार राष्ट्रीय महामागांना जोडणाऱ्या सुमारे 66 किलोमीटर लांबीचा आहे.
पूर्व भागातील मार्गिका अंतिम झाल्यामुळे त्यांचा समावेश पुण महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात करण्यात आला आहे. या मार्गिकला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली असून, त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आले आहेत.
हा रस्ता पुणे – सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथून सुरू होऊन पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे. दरम्यान, केंद्राने पुणे – संभाजीनगर हा हरित महामार्गांची घोषणा केली आहे.
286 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून, तो रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याला येऊन मिळणार आहे. पूर्व भागातील 12 गावांतून दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे अंतर 31 कि.मी. एवढे आहे त्यामुळे या बारा गावांतील रस्त्याचे काम एनएचएआयने करावे, त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा, असा प्रस्ताव होता.
त्यामुळे वर्तुळाकार रस्त्यासाठी या 12 गावांतील जमीन संपादित करणे आणि मार्गिका विकसित करण्यासाठी येणारा अंदाज पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च हा देखील एनएचएआयने करावा, असे ठरले आहे.
पूर्व भागातील रिंगरोड..
पुणे – मुंबई द्रुतगती महामार्ग – नाशिक – सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा.
एकूण लांबी 66.10 कि.मी. तर 110 मीटर रुंदीचा सहा पदरी महामार्ग.
एकूण प्रत्येकी सात बोगदे आणि भुयारी मार्ग, दोन नदीवरील बोगदे
लोहमार्गावरील ओलाडणी पूल.
524 हेक्टर जागेचे संपादन.