राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे- अहमदनगर -नाशिक (Nashik-Ahmednagar-Pune) अति- जलद हाय सेमी हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
तसेच या प्रोजेक्टबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्य मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने राहिलेल्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी MAHARAIL ला दिल्या होत्या.
या प्रकल्पासाठी 75% जमीन अधिग्रहीतही झाली आहे. परंतु आता या प्रोजेक्ट बाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. या रूट चा पुणे- अहमदनगर -नाशिक (Nashik-Ahmednagar-Pune) अति- जलद हाय सेमी हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्ट रद्द होऊन या ठिकाणी इंडस्ट्रियल महामार्ग होण्याची शक्यता आहे.
याबाबत रेल्वे मंत्रालयाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाने पुणे- नाशिक सेमी हायस्पीड़ रेल्वेमार्गाऐवजी रेल्वे कम रोडचा विचार करा, असा सल्ला दिल्याने हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पाबाबत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आवाज उठवला आहे पुणे- नाशिक या पहिल्या ब्रॉडग्रेज सेमी हायस्पीड रेल्वेच्या सर्व मंजुरी पार केल्या आहेत. केवळ हा प्रकल्प केवळ कॅबिनेटमध्ये मांडायचा राहिला होता. मात्र, छोट्या तांत्रिक कारणाने हा प्रकल्प गुंडाळला जात असेल तर इतकी वर्षे हे संबंधित अधिकारी झोपा काढत होते का? असा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकल्पाला जर मंजुरी मिळाली नाही तर त्याच्या मंजुरीसाठी मोठे आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीबर या प्रकल्पाबाबतच्या सद्यःस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे हा संपूर्ण परिसर उत्तर व दक्षिण भारताशी जोडल जाणार आहे.
तसेच, रात्रीच्य वेळी केवळ मालवाहतूक करण्याचे महारेलचे नियोजन आहे . या मार्ग ब्रॉडग्रेज आहे . पुणे- नाशिकसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे . रेल्वे हायस्पीड असल्यामुळे ब्राउंडी वॉल तर 750 मीटरवर अंडरपास आहे. तरीही 20 हजार कोटी खर्च करून वेगळा औद्योगिक द्रुतगती मार्गाची गरज काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१८ देशांमध्ये हायस्पीड या जमिनीवर आहेत, मग पुणे – नाशिक रेल्वेला विरोध का केला जात आहे. सगळे तांत्रिक मुद्दे तपासले गेले पाहिजे आणि कोणताही राजकीय हेतू न ठेवता हा प्रकल्प मंजूर करायला हवा सर्व परवानगी मिळून 75% जमीन अधिग्रहणानंतरही याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गेले सहा महिने रेल्वेमंत्र्यांकडे पडून आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी केली आहे.
संसदेत आवाज उठविणार पुणे – नाशिक सेमी हायस्पीड हा प्रकल्प गेला तर त्याला राजकीय पक्षाच्या नेत्याला या मतदारसंघात फिरता येणार नाही. 25 वर्षे विकासाचा प्रश्न पाहिला आहे. याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. प्रकल्प होण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच, संसदेत आवाज उठविला जाणार आहे. तरी देखील हा प्रकल्प होत नसेल तर तो व्हावा यासाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
या Nashik-Ahmednagar-Pune) अति- जलद हाय सेमी हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्ट ची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.