Take a fresh look at your lifestyle.

Baleno Facelift 2022 : फक्त 11,000 रुपयांत सुरु झाली बुकिंग !

0

शेतीशिवार टीम, 7 फेब्रुवारी 2022 : मारुती सुझुकीने अद्ययावत बलेनो प्रीमियम हॅचबॅक (Baleno premium hatchback) साठी बुकिंग सुरू केलं आहे जे लवकरच लॉन्च होणार आहे. तुम्ही Nexa आउटलेट आणि Nexa वेबसाइटला भेट देऊन 11000 रुपयांमध्ये नवीन Baleno बुक करू शकता. याशिवाय, कंपनीने असेही म्हटलं आहे की, नवीन बलेनो इमर्सिव्ह ड्रायव्हिंग एक्सपीरियंससाठी हेड-अप डिस्प्ले (HUD) देखील वापर करणार आहे.

कारच्या नवीन किंमतीबाबत मारुतीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. 2022 मारुती सुझुकी बलेनो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मार्केटमध्ये आणली जाऊ शकते. 2022 मारुती सुझुकी बलेनो आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत अपडेटेड डिझाइनसह येत आहे. यासोबतच यात आणखी अनेक अपडेटेड फीचर्स मिळणार आहेत.

फीचर्स :-

फेसलिफ्टेड बलेनोला इंटिग्रेटेड एलईडी डीआरएलसह (LED DRL) फुल एलईडी हेडलॅम्प मिळतील. तसेच, क्रोम इन्सर्टसह अपडेटेड ग्रिल असणार आहे. बलेनोला सुधारित एलईडी (LED फॉग) लाइट्स, एअर डॅम आणि रीमास्टर केलेला फ्रंट बंपर देखील मिळेल.

पूर्वीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की, बलेनो अनेक एक्सटीरियर एलिमेंट्ससह अपडेटेड केली जाईल जसे की नवीन अलॉय व्हील्स, रॅपराउंड टू-पीस एलईडी टेललाइट्स, इंटिग्रेटेड स्पॉयलरसह हाय-माऊंट स्टॉप लॅम्प, शार्क-फिन अँटेना आणि बरेच काही. आणि पुन्हा डिझाइन केलेला मागील बंपर रिफ्लेक्टरसह मिळणार आहे.

इंजिन :-

इंजिनबद्दल बोलायचं झालं तर तेच 1.2-लीटर पेट्रोल इंजिन नवीन बलेनोमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल युनिट आणि CVT युनिटसह येईल. लॉन्च झाल्यावर, नवीन बलेनो थेट Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza तसेच Honda Jazz सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

2022 मारुती सुझुकी बलेनोच्या बुकिंगची घोषणा करताना, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग और सेल्स) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, बलेनोने भारतात प्रीमियम हॅचबॅकची पुन्हा अपडेटेड केली आहे.

त्यांनी असंही म्हटलं की, आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीसह ही कार प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. आणि सातत्याने देशातील टॉप 5 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.